कोकण

सावंतवाडीत हवी वाहतुकीला शिस्त

CD

17428

सावंतवाडीत वाहतुकीला शिस्त लावा

रिक्षाचालक संघटना; ट्रॅफिक मार्किंगसह पार्किंग चार्टची मागणी


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः शहरात दिवसागणिक जटिल होत चाललेली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी २०१८ मध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रॅफिक मार्किंग आणि पार्किंग चार्टनुसार प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी ऑटो रिक्षा सेनाचालक-मालक संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जुन्या आराखड्याचा सविस्तर अभ्यास करून योग्य नियोजन करण्याचे सकारात्मक आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.
कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव आणि संघटनेचे सल्लागार सुधीर पराडकर यांनी चर्चेदरम्यान महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, ‘प्रशासनाने २०१८ मध्ये शहरात ट्रॅफिक मार्किंग करून एक पार्किंग चार्ट तयार केला होता. त्यामध्ये पार्किंग कुठे असावे आणि वाहतूक व्यवस्था कशी असावी, याचे शास्त्रशुद्ध नियोजन होते. या आराखड्याची जर आता काटेकोर अंमलबजावणी केली, तर शहरातील ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते.’ ​यावर नगराध्यक्षांनी या विषयाची पूर्ण माहिती घेऊन तातडीने प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सुंदरवाडी रिक्षाचालक-मालक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पॅट्रिक डिसोजा, खजिनदार जयवंत टमसाळी, पदाधिकारी सुनील तानावडे, राजन नवार, गुंडू सावंत, अण्णा कावले, संदेश राऊळ, पटेल, आदेश नाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT