कोकण

सुपिक जमिनीसाठी ‘बायोचार’ प्रभावी

CD

17422
कातवड : येथे शेतकऱ्यांना ‘बायोचार’ (जैव कोळसा) निर्मिती व वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणात सहभागी झालेले शेतकरी व अधिकारी.

सुपिक जमिनीसाठी ‘बायोचार’ प्रभावी

उमाकांत पाटील ः कातवडमध्ये शेतकऱ्यांना निर्मिती, वापराबाबत प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः सध्याच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. यावर उपाय म्हणून आणि जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘बायोचार’ हा अत्यंत प्रभावी पर्याय असल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी कातवड (ता.मालवण) येथे आयोजित ‘बायोचार’ (जैव कोळसा) निर्मिती व वापर प्रशिक्षणात केले.
कातवड येथील शेतकरी सुरेश गणपत परब यांच्या प्रक्षेत्रावर मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘बायोचार’ (जैव कोळसा) निर्मिती व वापर याविषयी शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कातवड सरपंच प्रतीक्षा हळदणकर, उपसरपंच गणेश चव्हाण, पोलिसपाटील शिवराम चव्हाण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवणचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कातवड गावातील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साळेल कृषी सेवक स्नेहा खोत यांनी सूत्रसंचालन केले. मालवण कृषी सेवक किशोर कदम यांनी आभार मानले.
---
...तरच पिकांना मिळतात अन्नद्रव्ये!
श्री. पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा किंवा पिकांचे अवशेष जाळून न टाकता, त्यापासून शास्त्रीय पद्धतीने बायोचार निर्मिती करावी. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.’ या प्रशिक्षण शिबिरात मालवण उपकृषी अधिकारी धनंजय गावडे यांनी पायरोलायझर (ड्रम) द्वारे बायोचार तयार करण्याची सोपी पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना समजावून सांगितली. तर कमी खर्चात आणि स्थानिक उपलब्ध साहित्यातून हा जैव कोळसा कसा तयार करायचा, याचे तांत्रिक ज्ञान श्रावण कृषी सेवक मनीषा अपराज यांनी दिले. ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT