कोकण

ऋषभ, राज, दीपाली, गौरी कदम यांची मॅरेथॉनमध्ये बाजी

CD

- rat१३p१९.jpg-
26O17432
नवनिर्माण मॅरेथॉन स्पर्धकांना झेंडा दाखवून उद्‍घाटन करताना फिजिओथेरपी संचालिका ऋतुजा हेगशेट्ये.
-----
ऋषभ, राज, दीपाली, गौरी मॅरेथॉनमध्ये अव्वल
नवनिर्माण महाविद्यालय; ७००हून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ : येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या नवनिर्माण मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यातील सुमारे ७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ऋषभ दसम, राज धुळप, दीपाली शिंदे आणि गौरी कदम यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांचा रोख रक्कम आणि चषक देऊन गौरव करण्यात आला. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार आणि ५०० रुपये तर लहान गटातील विजेत्यांना अडीच हजार, दीड हजार, १ हजार आणि ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. या सोहळ्याला अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, पोलिस निरीक्षक उदय झावरे, राजाराम चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते तसेच बापू शेट्ये, बापू शिंदे, उदय संसारे, दिलीप रहाटे, अशोक जाधव, युयुत्सू आर्ते, प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी हेगशेट्ये म्हणाले, खेड्यापाड्यातील गुणवंत धावपटूंना व्यासपीठ मिळावे आणि भविष्यात उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी ही स्पर्धा माईलस्टोन ठरेल.
-------
चौकट
स्पर्धेचा निकाल असा
१६ वर्षांखालील मुले (प्रथम,द्वितीय, तृतीय, चतुर्थ) : ऋषभ दसम, आदर्श भुवड, आर्यन बालदे, प्रसाद सुवरे. मुलींचा गट ः दीपाली शिंदे, गौरी शितप, प्रांजल घुगे, वैदेही देवलाटकर. खुला गट (पुरुष) ः राज धुळप, शुभम शितप, विशाल लटके, करण नटे. महिला ःगौरी कदम, अमिषा पवार, सानिया बडद, सानिका सनगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

Iran unrest : इराणमध्ये भयानक परिस्थिती! २००० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; सरकारनेही पहिल्यांदाच केलं मान्य

Vijay Hazare Trophy: विदर्भाची सेमीफायनलमध्ये धडक, इशांत शर्माच्या दिल्लीला हरवलं; उपांत्य फेरीत पोहचले 'हे' ४ संघ

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT