कोकण

-माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कोसुंब येथे निवासी शिबीर

CD

rat१३p१६.jpg-
P२६O१७४०३
संगमेश्वर - कोसुंब येथे निवासी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी उभारलेला बंधारा.
---
कोसुंब येथे एनएसएस निवासी शिबिर
माने अभियांत्रिकीच्या, विद्यार्थ्यांचा समाजोपयोगी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः देवरूखजवळील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर २ ते ८ जानेवारी या संपूर्ण आठवडाभराच्या कालावधीत कोसुंब येथे झाले. या शिबिरात विद्यार्थी स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, समाजसेवा, श्रमदान तसेच बौद्धिक सत्रांचा अनुभव घेतला.
शिबिराचे उद्‍घाटन संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते झाले. शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे योगा, प्राणायाम, शारीरिक व्यायाम व ईश्वर आराधनेने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रेवाळेवाडी व कोसुंब येथील जिल्हा परिषद शाळा, उपकेंद्र, राममंदिर तसेच समाजमंदिर परिसराची स्वच्छता केली. त्याचबरोबर बौद्धवाडी आणि फेफडेवाडी येथील ओढ्यांवर बंधारे बांधले तसेच गावातील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसमोर मतदान जागृती, प्लास्टिक निर्मुलन, पर्यावरण संवर्धनसारख्या विषयांवर पथनाट्य सदर करून महत्वपूर्ण सामाजिक संदेश देण्याचे काम केले. शिबिरामध्ये विविध विषयांतील तज्ञांच्या व्याख्याने झाली. स्ट्रेस मॅनेजमेंट विषयावर प्राचार्य डॉ. महेश भागवत, स्वजागृती या विषयावर प्रा. अरविंद कुलकर्णी, सायबर गुन्हे आणि जागरूकता विषयावर पोलिस बीट अंमलदार सचिन कामेरकर, सामाजिक बांधिलकी या विषयावर युयुत्सू आर्ते, नशामुक्त भारत विषयावर डॉ. रूपेश यादव यांची व्याख्याने झाली. या शिबिराचा समारोप संस्थाध्यक्ष रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरूद्ध जोशी, आयुब कापडी यांच्या उपस्थितीत पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT