कोकण

-हळकुंडापासून साडेचार किलोचा कंद

CD

-rat१३p१२.jpg, rat१३p१३.jpg-
P२६O१७३९९, P२६O१७४००
कुंबळे: यशस्वी उत्पादन घेतलेल्या हळदीच्या कंदासमवेत संदेश लोखंडे आणि समीक्षा लोखंडे.
-rat१३p१४.jpg
२६O१७४०१
कुंबळे: कंदाचे वजन ४.४६५ किलो भरले.
-----------
केवळ सात ग्रॅमच्या हळकुंडापासून साडेचार किलोचा कंद
कुंबळेत यशस्वी प्रयोग; समीक्षा लोखंडे, संदेश लोखंडे यांचा आदर्श
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.१३ ः पारंपरिक शेतीला आधुनिक नियोजनाची जोड दिल्यास माती किती मोठे चमत्कार घडवू शकते, याचे जिवंत उदाहरण कुंबळे येथील प्रगतिशील शेतकरी समीक्षा लोखंडे आणि संदेश लोखंडे या शेतकरी दाम्पत्याने दाखवून दिले आहे. केवळ ७ ग्रॅमच्या हळकुंडाच्या तुकड्यापासून तब्बल ४.४६५ किलो वजनाचा कंद तयार करत त्यांनी हळद लागवडीत नवा विक्रम घडवला आहे.
लोखंडे दाम्पत्य गेल्या सात वर्षांपासून हळद लागवड सातत्याने करत असून, यंदाही एसके ४ या जातीच्या वाणाची किमया त्यांनी यशस्वीरीत्या सिद्ध केली. लागवड ४ ते ७ जून या कालावधीत करण्यात आली. ४ जुलैला पहिले पुरण तर ७ ला दुसरे पुरण वेळेत दिल्यामुळे पिकाची वाढ उत्कृष्ट झाली. खतव्यवस्थापनात शेणखत, सुफला, १५-१५, निमपावडर, मुंगी पावडर यांचा संतुलित वापर करण्यात आला. रोग व कीड नियंत्रणासाठी कार्बन डायझिन पावडर व लिक्विड फवारणी करण्यात आली. या सर्व नियोजनाचा परिणाम म्हणजे ५ गुंठे क्षेत्रात लागवड करून १ गुंठ्यात तब्बल ४०० किलो हळद उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे वन्यप्राण्यांचा त्रास नसल्याने हळदीसोबत झेंडूसारखी अन्यही आंतरपिके घेणेही शक्य होऊ शकते. लोखंडे कुटुंबाने ५५ हजार रोपे तयार केली होती. त्या माध्यमातून तालुक्यात पाच एकर क्षेत्रावर हळद लागवड केली होती. तेव्हापासून त्यांनी ही सातत्यपूर्ण मेहनत कायम ठेवली आहे. ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
--------
कोट १
मशागत वेळेत, पुरण वेळेत आणि योग्य खत व्यवस्थापन केल्यास साडेचार किलोपेक्षा अधिक वजनाचे कंद सहज मिळू शकतात, असा अनुभव मिळाला. मातीमधून एवढे उत्पादन मिळत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांनी याकडे वळले पाहिजे. वास्तव परिस्थिती डोळसपणे पाहून शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
- समीक्षा लोखंडे, प्रयोगशील शेतकरी.
------
कोट २
लोखंडे कुटुंबाने सचिन कारेकर यांनी विकसित केलेली एसके ४ या वाणाची हळद लागवड करतात. मंडणगड येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना पंचायत समितीच्या कृषी विभागाने मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हळद लागवडीचा प्रकल्प केला होता. काही शेतकऱ्यांनी खूप छान पद्धतीने लागवड केली. त्यापैकी समीक्षा लोखंडे यांनी ही एसके ४ हळदीच्या लागवडीत सातत्य ठेवलं. माझी मंडणगडवरून बदली व आता स्वेच्छानिवृत्तीनंतरही हे शेतकरी संपर्कात राहिलेत.

- गजेंद्र पौनीकर, माजी कृषी विस्तार अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Daund Crime : पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला तुडविले; दौंडमध्ये कायद्याचा धाक संपला?

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

Latest Marathi News Live Update : आम्ही नरेश अरोरा यांच्या पाठिशी; कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT