खतीजा हायस्कूलमध्ये
शेडचे भूमिपूजन
चिपळूण : गोवळकोट येथील खतीजा हायस्कूल येथे शाळेच्या छतावर शेड उभारणीच्या कामाची सुरुवात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाली. कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून सात लाखांचा निधी त्यासाठी मंजूर झाला आहे. या प्रसंगी आमदार शेखर निकम म्हणाले, मतदार संघाचा सर्वांगीण विकास हाच माझ्या आमदारकीचा पाया आहे. शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, सहकार, पर्यटन तसेच उद्योग-व्यवसाय या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास करणे हेच माझे कर्तव्य आहे, असे सांगितले.
मॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे
स्वच्छतामोहीम
देवरूख ः मॉर्निंग क्रिकेट क्लब देवरूखतर्फे मूळ मार्लेश्वर देवस्थान असणाऱ्या मुरादपूर येथे स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अध्यक्ष अनिल कुडाळकर, संतोष लाड, नितीन शेडगे, बंड्या नारकर, अनिल सागवेकर, भाऊ पाटील, सिद्धेश वेल्हाळ तसेच इतर सर्व सदस्य सहभागी झाले होते.
-rat१३p२२.jpg-
२६O१७४५६
दक्ष जोयशी आणि श्रावणी जोयशी
गाधी विद्यालयाच्या
दोघांना ‘ए ग्रेड’
साखरपा ः शासनाच्या कला आणि संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या रेखाकला परीक्षेत कोंडगाव येथील श्रीमान तु. ग. गांधी विद्यालयाने घवघवीत मिळवले आहे. शाळेचा एकूण निकाल ९२ टक्के लागला असून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळवली आहे. एलेमेंटरी परीक्षेत शाळेचे ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दक्ष प्रदीप जोयशीने ए ग्रेड मिळवली आहे. इंटरमिजिएट परीक्षेत शाळेचे ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून श्रावणी संदीप जोयशीने ए ग्रेड मिळवली आहे.
लोकसहभागातून
शीर शाळेची रंगरंगोटी
गुहागर ः तालुक्यातील शीर शाळेची लोकसभातून रंगरंगोटी करण्यात आली. या शाळेला लोकसहभागातून अमरज्योती विकास मंडळ फणसवाडी, माजी विद्यार्थी संघटना वरची ठोंबरेवाडी, माजी विद्यार्थी संघटना साफसणवाडी, शीर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणपत ठोंबरे यांनी आर्थिक सहाय्य केले. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे शांताराम ठोंबरे, गणपत ठोंबरे, ओंकार ठोंबरे, नीलेश ठोंबरे, रमेश आंबेकर, सुनील आंबेकर या सर्वांनी विशेष सहकार्य केले. या सर्व देणगीदारांचे मुख्याध्यापिका तृप्ती निवाते, सहकारी शिक्षिका प्रेरणा प्रदीप भंडारी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.