कोकण

जलसंपदा विभागातील निवृत्तांची स्नेहसंमेलनामुळे पुनर्भेट

CD

17486

जलसंपदा विभागातील निवृत्तांची स्नेहसंमेलनामुळे पुनर्भेट

देवेंद्र शिर्के ः कुडाळात ‘रत्नसिंधू जलसंपदा ग्रुप’चा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ५८ वर्षांपासून ८५ वर्षांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रत्नसिंधू जलसंपदा मित्र परिवाराच्या ग्रुपने एकत्र आणण्याचे केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून कित्येक वर्षे पाटबंधारे विभागात एकत्र काम केलेले कर्मचारी आज अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र भेटत आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे माजी सचिव देवेंद्र शिर्के यांनी काढले.
रत्नसिंधू जलसंपदा परिवार (सेवानिवृत्त) या ग्रुपचे दुसरे स्नेहसंमेलन कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात रविवारी (ता. ११) आयोजित केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. शिर्के बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता बी. बी. पाटील, माजी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, माजी मुख्य अभियंता प्रकाश अबनावे, माजी मुख्य अभियंता सुनील काळे, माजी अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, माजी कार्यकारी अभियंता श्री. बांदेकर साहेब, माजी कार्यकारी अभियंता लवेकर, माजी उपविभागीय अधिकारी दत्ताराम सडेकर, माजी आरेखक श्री. बापू कुबल उपस्थित होते.
अभियंता विश्वेश्वरय्या व लक्ष्मीदेवीच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ सभासद दत्ताराम सडेकर व बापू कुबल यांचा प्रथम सत्कार करण्यात आला. श्री. पाटील यांनी, जीवनातील आनंद लुटण्यासाठी या वयात अशा उपक्रमांची नक्कीच आवश्यकता आहे. अनेक वर्षांनी जो मित्रपरिवार जमतो, त्यातून अनेक आठवणींना उजाळा मिळतो, असे सांगितले. पाटबंधारे प्रकल्पातील सेवानिवृत्तांच्या ग्रुपने ‘एनजीओ’ बनवून त्याद्वारे उपक्रम हाती घ्यावेत. त्याला लागणारे सहकार्य नक्कीच करू, असे आश्वासन माजी मुख्य अभियंता प्रकाशा अबनावे यांनी दिले. माजी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे व माजी अधीक्षक अभियंता राजेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले. राजू तावडे यांनी प्रास्तावित, सूत्रसंचालन श्रीराम चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे श्रीराम चव्हाण, राजू तावडे, राजन वालावलकर, संजय शेणई, सुरेश वर्दम, रत्नकुमार दामले, ॲड. जयसिंग वारंग, मायकेल डिसोजा, सखाराम सपकाळ, कमलाकर साळगावकर, भास्कर पवार, गुरुनाथ केसरकर, उल्हास केसरकर, अंकुश गवस, प्रमोद तायशेटे, वासुदेव सडवेलकर, प्रदीप मुळे, अर्जुन आयनोडकर, नंदकुमार साळवी, भगवान केसरकर यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

SCROLL FOR NEXT