rat१३p३३.jpg-
२६O१७४९८
चिपळूण ः मार्कंर्डी येथे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तिष्ठत राहावे लागते.
----
चिपळूण शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण
विकास आराखड्याप्रमाणे नियोजन; नगराध्यक्षांकडून पाहणी, निधीची तरतुद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : वाहतूककोंडी आणि अतिक्रमणांच्या जाळ्यात अडकलेल्या चिपळूण शहरातील प्रमुख रस्तेविकास आराखड्याच्या नोंदीप्रमाणे रुंद करण्यासाठी प्रशासनाने नियोजन हाती घ्यावे, अशा सूचना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिल्या आहेत. गेली अनेक वर्षे रुंदीकरणाअभावी रखडलेले प्रमुख वर्दळीचे रस्ते आता रुंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील मुख्य मार्ग असलेले बाजारपेठ प्रामुख्याने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख तसेच छत्रपती शिवाजी चौक ते स्वा. सावरकर चौक (पॉवर हाऊस) या प्रमुख मार्गांचे विकास आराखड्यातील रुंदीकरणाच्या नोंदीनुसार नियोजन करण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला रस्ते रुंदीकरणाबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या रस्त्याबरोबरच रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व उंची वाढवणे, सांडपाण्याचा निचरा आदी पायाभूत व्यवस्थांचा आढावा घेतला. रस्ते रुंदीकरणासाठी आमदार शेखर निकम यांनी यापूर्वीच शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद करून दिली आहे.
-------
चौकट
रामतीर्थ व्ह्यू पॉईंट गजबजणार
रामतीर्थ तलाव परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून शहराचा व्ह्यू पॉईंट उभारण्यात आला व त्याच ठिकाणी बगिच्यासह इमारती उभ्या करण्यात आल्या; मात्र, उद्घाटनानंतर हा परिसर वापराविना दुर्लक्षितच राहिला. सकपाळ यांनी या ठिकाणी पाहणी करून तातडीने या ठिकाणी स्वच्छता राबवून महाराष्ट्र हायस्कूल ते स्वामीमठ रस्त्यावर खाद्यविक्रेत्यांसाठी दिलेली पर्यायी जागा बदलून आता या पर्यटन केंद्रातील इमारतीत संबंधित खाद्यपदार्थ विक्रीसाठी जागा उपलब्ध करून चौपाटी व खाऊगल्लीला पर्यायी व्यवस्था केली आहे.
------
चौकट
‘करंजेश्वरी’ ठिकाणचा रस्ताही मार्गी लागणार
श्रीदेवी करंजेश्वरी ज्या ठिकाणी प्रकट झाली त्या स्थळाकडे जाणारा रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे. नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसह नगराध्यक्षांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर आठ दिवसांच्या आत अल्ताफ चिकटे यांच्या निवासस्थानी लगतच्या जमीनदारांची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत ६ मीटर, १२ मीटर की, १५ मीटर रस्ता करायचा याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.