कोकण

अत्याधुनिक डायलिसिस केंद्र सुरू

CD

- rat१४p६.jpg-
P२६O१७६८१
खेड ः परशुराम रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस युनिटचे उद्‍घाटन करताना विनती कंपनीचे महादेव महिमान व डावीकडून अधीक्षक डॉ. सचिन उत्पात, डॉ. अनुपम आलमान, डॉ. राकेश हसबे व सचिन खरे आदी.
----
खेडमध्ये अत्याधुनिक डायलिसिस केंद्र सुरू
रुग्णांना दिलासा; ओएनजीसीच्या सीएसआरमधून निधी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : येथील एमईएसएएम परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसेच पुणे येथील अमनोरा येस्स फाउंडेशन व सिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक डायलिसिस (रक्तशुद्धीकरण) केंद्राचे उद्‍घाटन झाले. या केंद्रासाठी आवश्यक असलेली चार डायलिसिस यंत्रे, चार खाटा आणि अशुद्ध पाणी शुद्धीकरण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ व पुणे साऊथ रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून देणगी स्वरूपात सर्व साहित्ये देण्यात आली आहेत. यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्षा मनीषा बेलगावकर आणि ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त विनोद अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. या केंद्राचे उद्‍घाटन विनती ऑर्गॅनिक्सचे अध्यक्ष महादेव महिमान आणि चिपळूण येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राकेश हसबे यांच्या हस्ते झाले. घाणेखुंट-लोटे परिसरासह खेड, चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मूत्रपिंड विकाराने (किडनीविकार) ग्रस्त असलेल्या रुग्णांना आता दर्जेदार, सुरक्षित आणि किफायतशीर उपचार स्थानिक पातळीवरच मिळणार आहेत. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना लांबच्या शहरात जावे लागत होते; मात्र आता ही सुविधा जवळच उपलब्ध झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार मिळाला आहे.
या यंत्रणेच्या उद्‍घाटनावेळी महादेव महिमान यांनी रुग्णालयाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच भविष्यात विनती ऑर्गॅनिक्स आणि परशुराम रुग्णालय यांच्यातर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून नवीन आरोग्य विभाग सुरू करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन उत्पात, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अनुपम आलमान, एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, परिचारिका, महाविद्यालयाचे शिक्षक-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voting: ईव्हीएम मशीनमध्ये चारपैकी कमी मतदान केल्यास काय होईल? जाणून घ्या मतदारांच्या मनातल्या प्रश्‍नांची उत्तरं

Makar Sankranti Tragedy : मकर संक्रातीच्या सणाला गालबोट! लेकीला घरी आणायला निघालेल्या पित्याचा वाटेतच चायनीज मांजाने घेतला बळी

Latest Marathi News Live Update : मतदानदिनी अ‍ॅक्वा लाईन मेट्रोची विशेष सेवा

Goa Tourism: गोव्याला फिरायला जाताय? तर अगुआडा किल्ल्यावरून हे दृश्य पाहायलाच हवे!

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये निवडणुकीआधी पोलिसांचा दणका! ६१ लाखांचे मद्य आणि सव्वाआठ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT