कोकण

कोमसापतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध स्पर्धा

CD

‘कोमसाप’तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरीतर्फे १४ ते २८ जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काव्यलेखन स्पर्धा ः युवागट १८ ते ३० वर्षे. विषय- माझी मराठी शाळा. खुला गट ३० वर्षांपुढील विषय- राजकारण दिशा व दशा लेखनमर्यादा २० ओळी. १६ला या स्पर्धा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार असून, अधिक माहितीसाठी डॉ. आनंद आंबेकर, गौरी सावंत-सावेकर यांच्याशी संपर्क साधावा.
वक्तृत्व स्पर्धेसाठी युवागट १८ ते ३० वर्षे आहे. त्यांना माझी मायबोली मराठी हा विषय दिला असून, वेळ ७ मिनिटे आहे. खुला गट ३० वर्षांपुढील वक्त्यांसाठी आहे. त्यांना हे विश्वची माझे घर हा विषय दिलेला असून, वेळ सात मिनिटे आहे. ही स्पर्धा १४ जानेवारीला सकाळी १० ते २ या वेळेत पटवर्धन हायस्कूल येथे होईल. अधिक माहितीसाठी विनायक हातखंबकर, राजेंद्र कदम, श्रद्धा बोडेकर यांच्याशी संपर्क साधावा तसेच ‌कथाकथन स्पर्धेत युवागट १८ ते ३० वर्षांपर्यंत असून, विषय ग्रामीण कथा हा दिला आहे. विषय सादरीकरणासाठी सात मिनिटे वेळ दिली आहे. खुला गट ३० वर्षांपुढील असून, संस्कार कथा हा विषय दिला आहे. त्यांना सात मिनिटे वेळ आहे. ही स्पर्धा १५ ला माळनाका येथील अ. के. देसाई हायस्कूल येथे होईल. या स्पर्धेसाठी संपर्क अंजली पिलणकर, चंद्रमोहन देसाई, विद्याधर कांबळे यांच्याकडे करावा. या स्पर्धेत सहभागी व्हा, असे आवाहन रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, सचिव विद्याधर कांबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT