कोकण

बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या अभिनय स्पर्धेत देवश्री सामंत प्रथम

CD

rat१४p४.jpg-
२६O१७६७६
बसणी ः येथे झालेल्या अभिनय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी.
---
अभिनय स्पर्धेत देवश्री सामंत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः तालुक्यातील बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे ग्रंथालयाच्या सभागृहात झालेल्या शालेय स्तरावरील कै. श्रीधर कृष्णा पेटकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धेत देवश्री सामंत हिने प्रथम क्रमांक पटकावला.
बसणी येथे झालेल्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रचिती पातयेने द्वितीय, तिर्था पावसकरने तृतीय तसेच अनुश्री हरचकर आणि आर्यन चौगुले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पहिल्या तीन क्रमांकांना १५०० रुपये, १३०० रुपये, ११०० रुपये रोख रक्कम तसेच उत्तेजनार्थ दोनजणांना प्रत्येकी पाचशे रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले. सुहास पेटकर यांनी वडील कै. श्रीधर पेटकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात पावस केंद्रावरून प्रथम तीन क्रमांक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पावस विभागाने या स्पर्धेत बाजी मारली. अजित पाटील आणि विनय घोसाळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे ही स्पर्धा मालगुंड, पावस, जाकादेवी, या केंद्रावर घेण्यात येईल त्यानंतर अंतिम फेरी बसणीमध्ये घेण्यात येईल, असे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतांमध्ये सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पेटकर, श्रीनिवास जोशी, प्रकाश सोहनी, प्रकाश लोगडे, जयवंत कदम, योगिनी सोहनी, प्रिया बंदरकर, राजश्री सुर्वे, श्वेता पाटील, सायली गावडे, जगदीश पाटील संतोष नेवरेकर आणि श्रीकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT