कोकण

आकाशात झेपावणार तेजस, मिराज, राफेल व सुखोई

CD

आकाशात झेपावणार ‘तेजस, मिराज, राफेलसह सुखोई’
‘एरो मॉडेलिंग शो’; २३ला स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी खेड लायन्स क्लब व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथे ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पाटीदार भवनशेजारील मैदानात हा थरार अनुभवायला मिळणार आहे.
‘एरो मॉडेलिंग शो’ विषयी माहिती शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मिलिंद इवलेकर, रोहन विचारे, अभिनय महाजन, शैलेश धारिया पाटील, प्रसाद राजवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शोमध्ये भारतीय वायुसेनेची शान असलेली मिराज २०००, तेजस, राफेल आणि सुखोई ३० ही चार आरसी (रिमोट कंट्रोल) फायटर विमाने प्रत्यक्ष मैदानातून आकाशात झेपावणार आहेत. अवघ्या ५० ते २०० फूट उंचीवर होणाऱ्या या विमानांच्या कसरती प्रेक्षकांचे डोळे दीपवून टाकतील, असे तोडकरी यांनी सांगितले तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्वतः विमान बनवण्याची आवड आहे अशा जिज्ञासूंसाठी केवळ ५०० रुपयांत तीन उडणाऱ्या विमानांचा संच मर्यादित स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार असून, एरो मॉडेलिंग या छंदाची सुरुवात कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शनही या वेळी केले जाईल.
विद्यार्थ्यांमध्ये वायूसेनेबद्दल कृतज्ञता निर्माण व्हावी आणि विमानांमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे तोडकरी यांनी सांगितले. आज हा शो पाहणारा खेडमधील एखादा विद्यार्थी भविष्यात वायूसेनेचा पायलट किंवा इंजिनिअर होऊ शकतो, असा विश्वास लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगांवकर यांनी व्यक्त केला.
------
चौकट
शोचे मुख्य आकर्षण
व्हर्टिकल टेकऑफ, व्हर्टिकल चार्ली, स्ट्रेटरोल, इनव्हर्टेड फ्लायिंग आणि विमानाची नागाप्रमाणे फणा काढणारी ‘कोब्रा मुव्हमेंट’ अशा रोमहर्षक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले जाईल. याशिवाय हवेत उडणारा ईगल, नाचणारा मासा, उडती तबकडी आणि रंगीबेरंगी पताकांचा वर्षाव करणारे सेस्ना विमान हे या शोचे मुख्य आकर्षण असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election 2026 : मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न? पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीन, तर नवी मुंबई अन् अमरावतीत पैशांचा बॅगा जप्त

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT