swt144.jpg
17688
शंकर पाटील, बिरू खरात, आदेश हाके, विवेक पाटील, प्रा. मल्लेश खोत
‘सिंधुदुर्ग’चे चार विद्यार्थी ‘अग्निवीर’
प्रतिकूल परिस्थितीत यश; सैन्य दलामध्ये देशसेवेची संधी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या चार एनसीसी कॅडेट्सनी भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ म्हणून झेप घेतली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कौतुकास्पद ठरले आहे.
भारतीय सैन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आदेश हाके, बिरू खरात, विवेक पाटील, शंकर पाटील यांचा समावेश आहे. हे चौघेही विद्यार्थी कला शाखेत शिक्षण घेत असून त्यांनी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागात कठोर परिश्रम घेतले होते. ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग आणि स. का. पाटील कॉलेजच्या एनसीसी विभागासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामागे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश आर. खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे चौघेही गरीब कुटुंबातील असून केवळ सैन्यात भरती होण्याच्या स्वप्नापोटी त्यांनी एनसीसीमध्ये प्रवेश घेतला होता. आज त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे स्वप्न सत्यात उतरले आहे, अशा भावना डॉ. खोत यांनी व्यक्त केल्या.
या यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे आणि सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. प्रभारी प्राचार्य के. के. राबते, माजी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर व सर्व प्राध्यापक वर्ग, पोलिस निरीक्षक मारुती जगताप, तहसीलदार गणेश लव्हे, ५८ बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक आणि सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या निमित्ताने प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी एनसीसी केवळ शिस्तच लावत नाही, तर सैन्य दल, नौदल, हवाई दल तसेच पोलिस आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते. आठवड्यातून केवळ चार तास देऊन विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी एनसीसीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.