swt146.jpg
17690
देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलमधील शासकीय रेखाकला परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
देवगड हायस्कूलचे विद्यार्थी चमकले
रेखाकला स्पर्धेत यश ः ''इंटरमिजिएट ग्रेड''चा १०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः येथील शेठ म. ग. हायस्कूलचा शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा व एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह कलाशिक्षक राजेंद्र कोयंडे यांना मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
येथील परीक्षेसाठी देवगड केंद्रातून एलिमेंटरी ग्रेडसाठी २७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील २७१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९.२६ टक्के लागला, तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी २३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील २३८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९.५८ टक्के लागला. येथील शेठ म. ग. हायस्कूलमधील एलिमेंटरी ग्रेडसाठी प्रविष्ट झालेले सर्व २९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये ए ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये हर्षदा शिवणगेकर, किमया मोंडे, पल्लवी ठाकरे, पार्थ ठुकरुल, प्रांजल कुबल, पूर्वी कोयंडे, समृद्धी खंडागळे, बी ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आर्या पाटकर, आर्या करंगुटकर, अनन्या ओगले, चैतन्य कोयंडे, मुग्धा मोंडे, प्रियल मिरजकर, रुबा शेखजमादार, साक्षी पवार, सलोनी पाटील, सलोनी केळुसकर, विराज चौगुले आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इंटरमिजिएट ग्रेडसाठी प्रविष्ट झालेले सर्व ३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये ए ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये केतकी आंबेरकर, सानवी मर्गज, शशांक खाडिलकर, बी ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आदित्य हेमंत शिंगाडे, भार्गवी चौगुले, चैत्राली कोयंडे, हुमेरा शेख, जिया हवालदार, मनुश्री काळदाते, सिया कुळकर्णी, सृष्टी डोईफोडे, स्वराली मिराशी आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.