कोकण

मेस्त्री यांचा सत्‍कार

CD

17787
सम्‍यक संबोधी संस्थेतर्फे
संदीप मेस्त्री यांचा सत्‍कार
कणकवली, ता. १४ : सम्यक संबोधी साहित्य संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विधवांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा लोकाभिमुख निर्णय घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत कलमठ येथे यशस्वीपणे राबविल्याबद्दल हा सन्मान केला.
विधवांना थेट आर्थिक दिलासा देणारा, संवेदनशीलता आणि माणुसकी जपणारा हा निर्णय दुर्बल घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, त्यांच्या जीवनाला आर्थिक आधार देणारा आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची सामाजिक बांधिलकी, समतेची जाणीव आणि लोककल्याणाची भावना स्पष्टपणे दिसून येते, असे प्रतिपादन सम्यक संबोधी साहित्य संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष किशोर कदम यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

Latest Marathi News Live Update : निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही - मनोज जरांगे

SSC and HSC Exam Centers: मोठी बातमी! दहावी-बारावीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT