कोकण

कणकवली : कोदे मागणी

CD

कणकवलीतील अवैध धंदे
बंद करण्याची भाजपची मागणी
कणकवली, ता. १५ : शहरात मटका, जुगार, ऑनलाइन कॅसिनो, गुटखा, गोवा बनावटीची दारू विक्री तसेच गांजा-चरस यांसारखे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्याकडे केली आहे. अन्यथा भाजपच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अवैध धंद्यांबाबत पोलिसांना वेळोवेळी माहिती देण्यात आली असूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याबद्दल श्री.कोदे यांनी नाराजी व्यक्त केली. या अवैध व्यवसायांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन कणकवली शहरातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अन्यथा कणकवली शहर भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अण्णा कोदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT