नासा, इस्रोला जिल्ह्यातील ५० विद्यार्थी जाणार
नियोजन समितीकडून सव्वादोन कोटींचा निधी ; २० हजार विद्यार्थ्यांच्यातून होणार निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५० विद्यार्थ्यांची निवड अमेरिका येथील ‘नासा’ (NASA) आणि भारतातील ‘इस्रो’ (ISRO) या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांच्या भेटीसाठी करण्यात आली आहे. ‘मिशन गगनभरारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांचा अंतराळ सफरीचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यासाठी २० हजार विद्यार्थ्यांनी चाचणी परीक्षा दिली होती.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यात १०० गुणांची विज्ञान विषयावर आधारित परीक्षा घेण्यात आली. ही चाचणी परीक्षा केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर घेण्यात आली. नऊ तालुक्यांतून प्रत्येकी १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील ५० विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासासाठी निवड केली गेली. यातील २० विद्यार्थी नासाला जातील. यामध्ये ६ शिक्षकांनाही संधी दिली जाणार आहे. या निवड चाचणी परीक्षेसाठी जिल्ह्यातील २० हजार विद्यार्थी बसले होते.
------
निवड झालेले विद्यार्थी
शार्दुल पणदीरकर, रूंजी जाधव, श्रेया चिंचघरकर, अपेक्षा बोत्रे, मानस जाधव (मंडणगड), आरोही मुलुख, नीरजा वेदक, दीक्षा येसवारे, अक्षरा पाटील, प्रांजल खळे, सृष्टी कोठावळे (दापोली), स्वरा मर्चंडे, शुभ्रा मोरे, आरोही महाडिक, अनुज मोहिते, कबीर धस, उन्नती पवार (खेड), ऋग्वेद मुळे, अनघा तांबेकर, यश खांबे, रिती मोरे, आयुष पुजारी, धनश्री भुवड, रेणुका इरले (चिपळूण), अर्णव बामणे, यश राठोड, शुभ्रा भाटकर, अनय कानडे, राहूल आंबेकर (गुहागर), आयशा खान, संस्कृती तरंगे, अथर्व गुरव, स्वरांगी कांबळे, स्वरूप पाटील, सोहम पाकतेकर (संगमेश्वर), ऋणाली पाटील, आर्या शिगवण, आरोही शिंदे, तिर्था चव्हाण, मनवा मुळ्ये, इशा घाणेकर (रत्नागिरी), पियुष सरक, विधी धुर्ये, राजकुवर किल्लेदार, हार्दिक कोपरे, सार्थक गितये, शिवसमर्थ मुंडे, स्वरांग भोसले, ओवी पवार, आराध्य देसाई, ईश्वरी चव्हाण, मेघा जानस्कर, स्वरा भोसले, वेद परवडे (राजापूर) या विद्यार्थ्यांची नासा-इस्रोसाठी निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.