कोकण

आठवडी बाजारात हरवलेला मोबाईल केला परत

CD

- rat१५p२.jpg-
P26O17896
संगमेश्वर ः हरवलेला मोबाईल परत करताना प्रदीप वाडकर, वीरेंद्र सुतार.

बाजारात हरवलेला मोबाईल केला परत
संगमेश्वरातील प्रदीप वाडकर, वीरेंद्र सुतारांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ : संगमेश्वर तालुक्यातील आठवडा बाजाराच्या गजबजाटात हरवलेला किमती मोबाईल प्रामाणिक नागरिकांच्या मदतीने योग्य मालकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचल्याचा विषय सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे. हा प्रामाणिकपणा प्रदीप वाडकर आणि वीरेंद्र सुतार यांनी दाखवला.
धामणी (पवारवाडी) येथील निकिता पवार यांचा किमती मोबाईल फोन संगमेश्वर परिसरात हरवला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच त्यांची मोठी धावपळ सुरू झाली होती. मोबाईलमध्ये महत्त्वाची वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक व आवश्यक कागदपत्रे असल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली होती. बुधवारी संगमेश्वर येथे आठवडा मोठा बाजार भरला होता. बाजारामुळे परिसरात मोठी गर्दी, वाहनांची वर्दळ आणि गोंधळाचे वातावरण होते. अशा परिस्थितीत हरवलेला मोबाईल सापडणे आणि तो योग्य मालकापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य वाटत होते; मात्र याच गर्दीत संगमेश्वर (निढळेवाडी) येथील वाडकर आणि सुतार या दोन सजग नागरिकांना हा मोबाईल आढळला. मोबाईल लॉक असल्यामुळे त्यांना मालकाचा संपर्क क्रमांक मिळू शकला नाही. तरीही मोबाईल सुरक्षित ठेवून मालकाचा शोध घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दरम्यान, पवार यांनी दुसऱ्या मोबाईलवरून आपल्या हरवलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. हा कॉल सुतार यांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला. त्यांनी मोबाईल पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री दिली आणि योग्य ओळख पटवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर अत्यंत इमानेइतबारे आणि सुरक्षितपणे मोबाईल पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी वाडकर आणि सुतार यांचे मनापासून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT