- rat१५p३.jpg-
२६O१७९१२
लांजा : घंटागाडीमध्ये स्वतः कचरा उचलून टाकताना नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये.
-----
घंटागाडीत बसून नगरसेवकांची स्वच्छता पाहणी
नगरसेवक मायशेट्ये यांचा प्रभागनिहाय दौरा; लांजा शहरातील आगळावेगळा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १५ : लांजा नगरपंचायत हद्दीतील कचरा संकलन व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी थेट घंटागाडीत स्वार होत विविध प्रभागांचा दौरा केला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रभागांमधून सकाळी आठ वाजल्यापासून घंटागाडी फिरत असताना मायशेट्ये स्वतः उपस्थित राहिले. या वेळी कचरा कोणत्या पद्धतीने संकलित केला जातो, स्वच्छता कर्मचारी आपले काम कसे पार पाडतात तसेच नागरिकांकडून कचरा देताना काही अडचणी येतात का, याची त्यांनी सखोल माहिती घेतली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. घंटागाडीमधून फिरताना कचरा संकलन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सुविधा, वेळेचे नियोजन, घंटागाडी वेळेवर येण्याबाबतची स्थिती तसेच नागरिकांच्या सहकार्याची पातळी यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. याशिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि कामाच्या परिस्थितीबाबतही त्यांनी माहिती घेतली. आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता इतर प्रभागांमध्येही भेटी देत मायशेट्ये यांनी नागरिकांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी नागरिकांना मदत करत स्वतः कचरा घंटागाडीत टाकून स्वच्छतेबाबतचा सकारात्मक संदेश दिला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, थेट मैदानात उतरून आमच्या समस्या समजून घेत आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कार्यालयात बसून केवळ सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष कामात सहभागी होऊन प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा मजबूत करण्याचे कार्य या उपक्रमातून साधले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.