कोकण

''बांद्याचा बाप्पा''ने जपली ''बांधिलकी''

CD

swt1512.jpg
17963
बांदाः व्यापारी संघाला आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करताना गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

‘बांद्याचा बाप्पा’ ने जपली ‘बांधिलकी’
स्मशानभूमीसाठी मदतः व्यापारी संघाकडे लाखाचा धनादेश सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर गांधी चौक बांदाच्या ‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाने आदर्शवत पायंडा घालताना सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने येथे व्यापारी संघाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वैकुंठभूमी (स्मशानभूमी) येथील पत्रा शेडसाठी एक लाख रुपयांची देणगी दान स्वरुपात दिली.
बांद्याच्या बाप्पा मंडळाची ही सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. बांदा व्यापारी संघाच्या माध्यमातून येथील स्मशानभूमीत पत्र्याची शेड उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून देणगी देत हातभार लावला आहे. मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांच्या हस्ते एक लाखाची रोख रक्कम व्यापारी संघाच्या अजय महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वेश गोवेकर, भाऊ वाळके, प्रसाद वाळके, भाऊ (विठ्ठल) वाळके, ओंकार नाडकर्णी, साईप्रसाद काणेकर, निखिल मयेकर, सुधीर शिरसाट, राकेश केसरकर, राजेश विरनोडकर, अजिंक्य पावसकर, स्वप्नील पावसकर, नीलेश उर्फ पापू कदम आदी उपस्थित होते. ''बांद्याचा बाप्पा'' मंडळाने यापूर्वी कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वितरण, बांद्यातील गरजूंना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, पूरग्रस्तांना आर्थिक मदत आदी प्रकारची आर्थिक व वस्तुरूपी मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचे कार्य इतर मंडळांसाठी आदर्शवत असे असून जिल्हाभरात कौतुक होत आहे.

municipal elections exit poll 2026 : मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीच भारी; ठाकरेंचा गड ढासळणार अन् काँग्रेस आघाडीलाही फटका

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting Updates : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान संपले, कोणत्या जागी किती टक्के मतदान झाले?

Municipal Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कधी सुरू होणार? सर्वात जलद निकाल कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

पुन्हा एकदा स्त्रियांवरच सिनेमा का केला? केदार शिंदेंचं ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' बद्दल स्पष्ट भाष्य

Rail Tour Package: भाविकांसाठी खुशखबर! आता फक्त १३ हजारांत श्रीशैलम दर्शन; जाणून घ्या रेल्वे टूर पॅकेज

SCROLL FOR NEXT