पुण्यातील प्रभाग क्रमांक २६ मधील महात्मा फुले सभागृहात मतदान सुरू होऊन दोन तास उलटले तरी मतदान यंत्र बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे उमेदवार साकिब आबाजी आक्रमक झाले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास थेट आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.