कोकण

मालवणात २२ फेब्रुवारीला जिल्हास्तर बालनाट्य स्पर्धा

CD

मालवणात २२ फेब्रुवारीला
जिल्हास्तर बालनाट्य स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : पर्यावरण तसेच कांदळवनाविषयी मुलांमध्ये प्रचार, प्रसार होऊन जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने इको फोक्स व्हेंचर्स, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा २२ फेब्रुवारी रोजी येथील मामा वारेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी येथील अभियान आम्ही मालवणी, हॉटेल चैतन्य व उबंटू कॅफे, पिंटो सी फूड आणि एशियन इन्फोटेक हे सहप्रायोजक आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील चैतन्य हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या स्पर्धेची माहिती देण्यात आली. यावेळी ''आम्ही मालवणी''चे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, चैतन्य हॉटेलचे नितीन वाळके, अजय मुणगेकर आदी उपस्थित होते. वाळके यांनी स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेसाठी खाजण (वेटलैंड) जैवविविधतेचे साजण, नेमेचि येतो, मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा आणि सागरा (चा) प्राण तळमळला?'' असे तीन विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी अनुक्रमे १२ हजार, ८ हजार, ५ हजार, प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शनाकरिता प्रत्येकी ५०० रुपये, चषक व प्रमाणपत्र, पुरुष अभिनय, स्त्री अभिनय तसेच तांत्रिक अंग म्हणून प्रथम तीन क्रमांकांना चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता सुरू होऊन सायंकाळी बक्षीस वितरण होईल. प्रथम येणाऱ्या दहा संघांना प्राधान्य देण्यात येईल. संघात किमान सहा व कमाल दहा विद्यार्थी असावेत. मालवण तालुक्या बाहेरून येणाऱ्या संघास १२०० रुपये प्रवास खर्च दिला जाईल. इच्छुक संघानी आपली नावे ३१ जानेवारीपर्यंत द्यावीत. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी नितीन वाळके, रवींद्र तळाशीलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT