कोकण

पत्रलेखन स्पर्धेला कासार्डेत प्रतिसाद

CD

swt1517.jpg
17934
कासार्डे ः येथील माध्यमिक विद्यालयात पत्रलेखन स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी. सोबत शिक्षक वर्ग व डाक कर्मचारी.

पत्रलेखन स्पर्धेला
कासार्डेत प्रतिसाद
तळेरे, ता. १५ः कासार्डे माध्यमिक विद्यालयात भारतीय डाक विभागाच्यावतीने ‘ढाई आखर’ या राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. यात तब्बल १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
‘एक पत्र माझ्या आदर्श व्यक्तीला’ असा या स्पर्धेचा विषय होता. यावर विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक, समाजसुधारक, थोर क्रांतिकारक यांना उद्देशून भावपूर्ण पत्रे लिहिली. अनेक विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्राचे स्वरूप प्रथमच जवळून अनुभवले. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केवळ पत्रलेखनाचा अनुभवच नव्हे, तर भारतीय डाक विभागाच्या कार्यपद्धतीचीही माहिती देण्यात आली.
देवगड उपविभागातील कर्मचारी रोहन सावंत व डाक आवेक्षक विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना डाक विभागातील आधुनिक बदल, पत्र पाठविण्याची प्रक्रिया, पिनकोडचे महत्त्व तसेच विविध डाक योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांची या विषयावरील उत्सुकता अधिक वाढली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची गोडी निर्माण होऊन, डिजिटल युगातही पत्रसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT