मालवणच्या व्यापाऱ्यांत
दंडाच्या नोटिशीने खळबळ
फसवणुकीचा प्रकार ः सतर्कता बाळगण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला ‘हॉटेलमध्ये गाणी लावल्याबद्दल ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्या’ अशी विचित्र कायदेशीर नोटीस प्राप्त झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार फसवणुकीचा असून, व्यापाऱ्यांनी अशा नोटिसींना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी केले आहे.
संबंधित हॉटेल व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी एक पत्र मिळाले होते. त्यामध्ये ‘तुमच्या हॉटेलमध्ये वाजवली जाणारी गाणी ही ‘फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमिटेड’, अंधेरी-मुंबई या संस्थेच्या मालकीची आहेत. तुम्ही परवानगी न घेता ही गाणी वाजवून कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केले आहे,’ असा दावा केला होता. काही दिवसांनंतर एका महिला वकिलाच्या नावाने थेट नोटीस पाठवून ५० लाख रुपयांच्या भरपाईची मागणी करण्यात आली. या अचानक आलेल्या मोठ्या रकमेच्या मागणीमुळे संबंधित व्यावसायिक भयभीत झाला होता.
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा व्यापारी महासंघाने याची गंभीर दखल घेतली आहे. श्री. वाळके यांनी पत्रकारांशी बोलताना यातील धोके स्पष्ट केले. या नोटिशीला कोणताही ठोस कायदेशीर आधार नसून, हा केवळ आर्थिक लुबाडणुकीचा प्रयत्न आहे. अशा नोटिसींना उत्तर दिल्यास किंवा त्यातील लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होणे किंवा बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडू शकतात. व्यापाऱ्यांनी अशा नोटिसींना उत्तर देऊ नये आणि घाबरून न जाता महासंघाशी संपर्क साधावा. अशी कोणतीही संशयास्पद नोटीस आली असेल तर त्यावर कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्यावा किंवा व्यापारी संघटनेला कळवावे, असे आवाहन श्री. वाळके यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.