कोकण

काजू आंबा बाग जळाली; ढांगर येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

CD

rat१५p३६.jpg, rat१५p३७.jpg-
२६O१८००६, २६O१८००७
मंडणगड ः ढांगर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत रघुनाथ पाडावे यांच्या बागेतील आंबा-काजूचे नुकसान झाले.
------
ढांगरमधील आगीत काजू, आंबा बाग खाक
शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे मोहरलेली झाडे होरपळली
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ ः तालुक्यातील ढांगर येथे विद्युतवाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे काजू व हापूस आंब्याच्या बागेला आग लागून शेतकरी रघुनाथ पाडावे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता. १४) घडली.
पाडावे यांच्या बागायती क्षेत्रातून ग्रामपंचायत अडखळ-ढांगर नळपाणी पुरवठा योजनेची विद्युतवाहिनी व खांब टाकण्यात आले आहेत. पूर्वी शेताच्या कडेला असलेले सिमेंटचे खांब तुटल्यानंतर शेतकऱ्याची परवानगी न घेता लोखंडी खांब बागेच्या मध्यभागातून उभारण्यात आले. संबंधित खांबाचे स्टे तुटून खांब वाकडे झाल्याने विद्युततारा एकमेकांना चिटकून वारंवार स्पार्किंग सुरू होती. याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर मोठी आग भडकली. या आगीत १५ वर्षांपूर्वी लागवड केलेली हापूस आंब्याची १५ व काजूची ५ झाडे जळून खाक झाली. काजूची झाडे शंभर टक्के जळाली असून, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की, अनेक झाडांच्या खोडांना गंभीर इजा झाली आहे.
या प्रकरणी कृषी व महसूल विभागाशी संपर्क साधला असता, महावितरणकडून कळवल्याशिवाय पंचनामा करता येणार नाही, असे उत्तर मिळाल्याचे शेतकऱ्याने सांगितले तसेच शेताच्या मध्यभागातून खांब हटवण्याची मागणी केली असता निधी नसल्याचे कारण देत मजुरी शेतकऱ्यांनीच करावी, असे उत्तर मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. वेळेवर दखल घेतली असती तर वर्षानुवर्षे जिवापाड जपलेली झाडे वाचू शकली असती, अशी खंत परिसरातील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
--
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
यंदा मोठ्या प्रमाणात काजू, हापूसची मोहोर आलेली ही झाडे आगीत नष्ट झाल्याने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT