कोकण

महाराष्ट्रांच्या लेकींच्या कार्यक्रम संपन्न

CD

महाराष्ट्राच्या लेकींचा
कार्यक्रम संपन्न
लांजा ः तालुक्यातील प्रभानवल्ली येरडववाडी सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा कार्यक्रम नुकताच झाला. लेक वाचवा, लेक शिकवा अंतर्गत शाळा प्रभानवल्ली येरडववाडी आणि पालक, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदोत्सवासाठी शिक्षणविस्तार अधिकारी विमल चव्हाण, डी. जे. सामंत कॉलेजचे प्राचार्या डॉ. कांताजी कांबळे, हर्चे हायस्कूलचे संस्थापक बबन मयेकर, सानेगुरुजी विचारमंच अध्यक्ष नाना मानकर, उपाध्यक्ष चंद्रकांत परवडी आदी उपस्थित होते. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या कुमारी आफ्रीन आरीफ शेख हिचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे निमित्ताने येरडववाडी महिला तसेच विद्यार्थिनी यांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला.


जीआयटीमध्ये आज
उद्योगावर परिषद
चिपळूण ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात शुक्रवारी (ता. १६) HR Conclave २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढेल, उद्योग–शिक्षणसंस्था सहकार्य अधिक बळकट होईल. दीर्घकालीन भागीदारीतून राष्ट्रनिर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास परिषदेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बी. मराठे व संस्था प्रतिनिधी सतीश वेंगोली यांनी व्यक्त केला. भविष्यासाठी सज्ज अभियंते घडवण्यासाठी उद्योग व शिक्षणसंस्थांमधील दुवा या विषयावर परिषद होणार आहे. कार्यक्रमासाठी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे उपस्थित राहणार आहेत.

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने
जिजाऊ जयंती साजरी

चिपळूण ः येथील जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती अनोख्या पद्धतीने भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली. कळकवणे आदिवासी पाडा या दुर्गम व उपेक्षित भागात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करून सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले. ज्या ठिकाणी अनेक मुलांना राजमाता जिजाऊ कोण होत्या, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते याची ओळख नाही, अशा ठिकाणी जिजाऊंच्या जीवनकार्याची, संस्कारांची व राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या योगदानाची ओळख करून देण्यात आली. मुलांच्या मनात इतिहासाविषयी अभिमान, स्वाभिमान व संस्कार रूजवणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या वेळी उपस्थित महिलांना साड्या, मुलांना खाऊ व आवश्यक कपड्यांचे वाटप करून जिजाऊंच्या मातृत्वाची आणि मायेची खरी अनुभूती देण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या मालती पवार, निर्मला जाधव, विना जावकर, अनामिका हरदारे, दीपा हारदारे, मनोरमा पाटील, सुप्रिया कवितके, श्रद्धा कदम, सुवासिनी सावंत आदी उपस्थित होत्या.

संजय गांधी निराधार
समिती अध्यक्षपदी बुरोंडकर
मंडणगड ः संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. तालुक्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी इरफान बुरोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यपदी स्वप्नील तांबे, तेजल निकम, अनिल हेंद्रे, भरत भोगल, सुरेश दळवी, रूपेश पवार, आनंद भाटे, रामदास भागडे आणि सुभाष सापटे यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT