कोकण

गोठेगावच्या अपेक्षेची अंतराळभरारी

CD

- rat16p11.jpg-
P26O18142
गोठेगाव : गावातील ग्रामस्थ, महिला मंडळाच्यावतीने अपेक्षा बोतरे हिचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

अपेक्षा बोतरेची नासा, इस्त्रो
अभ्यास दौऱ्यासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ ः साधी परिस्थिती; पण असाधारण स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा गोठे बोरखत या शाळेची विद्यार्थिनी अपेक्षा सुनील बोतरे हिने आपल्या कर्तृत्वाने तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. सातवीत शिकणाऱ्या अपेक्षाची नासा आणि इस्रो या जागतिक कीर्तीच्या अंतराळ संस्थांच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. आई-वडील मुंबईत कामानिमित्त राहत असल्याने अपेक्षा आजी -आजोबांसोबत गोठेगाव येथे राहते. घरातील परिस्थितीची जाणीव ठेवत ती अभ्यासाबरोबरच आजीला घरकामात, जेवण करण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत मोलाची मदत करते. ५वी आणि ६वीमध्ये ती तालुकास्तरापर्यंत पोहोचली. ७वीमध्ये तिने केंद्रस्तरावर तालुक्यातील ९४७ विद्यार्थ्यांतून दुसरा क्रमांक पटकावला. तालुकास्तरावर ७९ विद्यार्थ्यांतून पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले. पुढे जिल्हास्तरावर मुलाखत व प्रात्यक्षिक फेरीत तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली आणि त्यातूनच नासा इस्रो दौऱ्यासाठी निवड निश्चित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT