कोकण

अभिषेक डिके १०० मीटर धावणेत प्रथम

CD

- rat१६p१३.jpg-
P२६O१८१७३
सावर्डे : अभिषेकला पदक देऊन गौरवताना स्पर्धेचे संयोजक.
----
अभिषेक डिके १०० मीटर धावणेत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १६ : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील अभिषेक डिके याने जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात अस्थिव्यंग गटातून प्रथम क्रमांक पटकावला. अभिषेक हा पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी आहे.
जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. अभिषेकने १०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात अस्थिव्यंग गटातून प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यातील १७ स्पर्धकांमधून अव्वल स्थान मिळवले. त्याला क्रीडाशिक्षक कोदारे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संस्था संचालक मंडळ, शालेय समितीचे चेअरमन संभाजी महाडिक, मुख्याध्यापक चंदनशिवे, पवार, बिजम, खानविलकर, संजय चव्हाण यांनी अभिषेकचे हार्दिक अभिनंदन केले. अभिषेकच्या या यशामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाक्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT