कोकण

महाआघाडीची शक्यता

CD

संगमेश्वरमध्ये महाआघाडीची शक्यता
राष्ट्रवादीचा पुढाकार ; सात जिल्हा परिषद गट
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संगमेश्वर तालुक्यात महाआघाडीद्वारेच लढवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पावले उचलण्यात आली आहेत.
तालुक्यातील एकूण ७ जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गणांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) आपल्या वाट्याला किमान एक जिल्हा परिषद गट आणि तीन ते चार पंचायत समिती गण मिळावेत, अशी मागणी केली आहे. यामध्ये विशेषतः या जागांवर पक्षाने आपला दावा ठोकला आहे. या संदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने यांनी दुजोरा दिला आहे. तालुक्यात ठाकरे गटाची ताकद मोठी आहेच; पण आता मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आम्ही ताकदीने मैदानात उतरणार आहोत. पंचायत समितीवर महाआघाडीचा झेंडा फडकवण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास बने यांनी व्यक्त केला आहे. जे कार्यकर्ते सामाजिक कामात अग्रेसर आहेत आणि ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे अशाच लोकांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून आम्ही विरोधकांना तगडे आव्हान देऊ, असे बने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यात या राजकीय समीकरणामुळे आगामी निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उबाठा, मनसे आणि वंचित यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT