कोकण

‘रास्तभाव’साठी अर्जाचे आवाहन

CD

‘रास्तभाव’साठी
अर्जाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील निवडक गावांसाठी रास्तभाव दुकान परवाने मंजुरीसाठी १ जानेवारीला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार संबंधित गावांतील पंचायत, बचत गट व सहकारी संस्थांनी प्राधान्यक्रमानुसार विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ३१ जानेवारीपर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
तालुकानिहाय रास्तभाव दुकान परवाना मंजुरीसाठी गावे : सावंतवाडी : सावंतवाडी ई वॉर्ड, सावंतवाडी ई-१ वॉर्ड, वेंगुर्ले : वायंगणी, निवती मेढा, कुडाळ : कविलगाव, रुमडगाव, कुडाळ नं. १, मालवण : आंबेरी, गोठणे, खरारे, ओवळीये, खोटले, तारकर्ली, कणकवली : कुंभवडे, ओझरम, वारगाव, तळवडे, मोहूळ, जांभळगाव कासार्डे, देवगड : दाभोळे, गढीताम्हाणे, हडपीड, लिंगडाळ, मिठमुंबरी, नाद, पाटगाव, वानिवडे, सांडवे, कट्टा. दोडामार्ग व वैभववाडी तालुके यासाठी कोणतीही गावे प्रस्तावित नाहीत.
--
ओटवणे येथे
फेब्रुवारीत स्पर्धा
ओटवणे : गावठणवाडी येथील बबलू गावकर मित्रमंडळातर्फे आयोजित ‘ध्रुव चषक २०२६’ खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आचारसंहितेमुळे पुढे ढकलल्या होत्या. त्या आता २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान ओटवणे ग्रामपंचायतीलगतच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गोवा व महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १ लाख २ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक ५० हजार २ रुपये व ध्रुव चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांसह विविध वैयक्तिक पारितोषिके व चषकही देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी उदीत गावकर अथवा विशाल गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिन गावकर व आकाश मेस्‍त्री यांनी केले आहे.
-------------
मळगाव येथे
वर्धापन उत्सव
मळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले बसस्थानकातील श्री साई मंदिराचा २९ वा वर्धापन उत्सव १९ व २० ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. १९ ला सकाळी ८ वाजता गणेशपूजन व धार्मिक विधी, ९ वाजता साईंची पालखी मिरवणूक, दुपारी ३ ते ५.३० हळदी-कुंकू, ४ वाजता स्थानिक भजने, ५ वाजता ब्राह्मण भजन मंडळ (तेर्सेबांबार्डे), ७ वाजता साईंची महाआरती, ७.३० वाजता पालखी मिरवणूक व रात्री ९ वाजता पार्सेकर नाट्यमंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग ‘कर्म प्रारब्ध’ सादर होणार आहे. २० ला सकाळी ८ महारुद्र जप सांगता, १० साईबाबांची महापूजा, ११ महाआरती व महानैवेद्य, दुपारी १२ ते सायं. ४ महाप्रसाद, ५ भजने, ७ महाआरती, ७.३० पालखी मिरवणूक व रात्री ९ वाजता दोन अंकी मालवणी नाटक ‘एकापेक्षा एक’ सादर होणार आहे.
---
कोळंब येथे
धार्मिक कार्यक्रम
मालवण : कोळंब येथील श्री महापुरुष पार येथे मंगळवारी (ता. २०) ब्राह्मण भोजन व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता लघुरुद्राने होणार आहे. दुपारी १२.३० वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण होईल. दुपारी ३.३० वाजता हळदी-कुंकू, ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ पासून तीर्थप्रसाद व ७ नंतर भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
--------------
निरवडे येथे
उद्या नाटक
न्हावेली : निरवडे येथील साटम महाराज मंदिरातील साटम महाराज रंगमंचावर रविवारी (ता. १८) रात्री ९ वाजता पारंपरिक पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविक व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय तानावडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईच्या निकालात ट्विस्ट; उरलेल्या १० जागांवरुन ठरणार पुढचं गणित, काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत?

BMC Election: महायुतीचा महास्फोट! देवेंद्र फडणवीसांनी २५ वर्षांचा भाजपचा वनवास कसा संपवला? ठाकरे बंधुंना बाजुला कसं सारलं? वाचा...

BABAR AZAM VIDEO : बाबर आझमचा Live Match मध्ये स्टीव्ह स्मिथने कचरा केला? सारे हसू लागले अन् पाकिस्तानी फलंदाज संतापला

मुंबईचा कौल, सत्तासमीकरणांवर परिणाम... BMC निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

Municipal Eection Results 2026 : अकोल्यात भाजपला १० जागांचा फटका, संपूर्ण ८० जागांचा निकाल जाहीर; पण महापालिकेवर कुणाची सत्ता? वाचा विजयी उमेदवारांची यादी...

SCROLL FOR NEXT