कोकण

गावठी बाजारातून श्रमप्रतिष्ठा, विक्रीकौशल्याचा धडा

CD

18193

गावठी बाजारातून श्रमप्रतिष्ठा, विक्री कौशल्याचा धडा

विद्यार्थ्यांचाही उत्साह; कट्टा येथील वराडकर हायस्कूलचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : ग्रामीण भागातील पारंपरिक पिके, स्थानिक उत्पादने यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा तसेच विक्री कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे गावठी आठवडी बाजाराचे आयोजन केले होते. या उपक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बाजाराचे उद्‍घाटन शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर आणि संस्थेचे सहसचिव साबाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे उपस्थित होते. या वैशिष्ट्यपूर्ण बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्थानिक स्तरावर पिकविली जाणारी विविध धान्ये व उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती. यामध्ये प्रामुख्याने गावठी उकडीचे तांदूळ, सुरय तांदूळ, कुळीथ, चवळी, वालीचे गर, नाचणी, शेंगा, गावठी हळद, खोबरेल तेल, कोकम, आगळ, गावठी अंडी, घावण पीठ, वडे पीठ, पिठी, कणगी, करांदे, सुरण, नारळ, शहाळी, सुके खोबरे, ताज्या गावठी भाज्या, बांबूची उत्पादने आणि मातीच्या वस्तू यांचा समावेश होता. विशेष आकर्षण म्हणून ‘स्काऊट गाईड’ विभागामार्फत ‘विद्यार्थी खरी कमाई’ स्टॉल लावला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करून प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभवातून अर्थार्जनाचे धडे गिरविले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. गावडे, पर्यवेक्षक महेश भाट आदींचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
---------------
कोट
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे आणि स्थानिक बाजारपेठेची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
- देवयानी गावडे, मुख्याध्यापिका, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना अजूनही विश्वास; संजय राऊत म्हणाले, ''अद्यापही...''

Devendra Fadnavis Reaction : महापालिका निवडणुकांमधील ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

फरहान खानची मुख्य भूमिका असलेला 120 बहादूर आता पहा ओटीटीवर ! कधी आणि कुठे घ्या जाणून

WPL 2026 : डॅनी व्हॅटसह गुजरात जायंट्सच्या खेळाडू पोहोचल्या धारावीत; इंग्लंडची खेळाडू म्हणाली, येथील लोकं...

Pune Election Results: पती-पत्नीचा दणदणीत विजय; पुण्यातल्या 'या' प्रभागाची राज्यात होती चर्चा

SCROLL FOR NEXT