rat16p3.jpg
O18133
रत्नागिरीः पोलिस अधीक्षक कार्यालयातील विशेष पोलिस अंमलदारांमार्फत संदेशवहनाच्या कामाचे संनियंत्रण केले जाते.
------------
तक्रारदारांना घरबसल्या मिळणार तपासाची माहिती
‘मिशन प्रगती’ उपक्रम यशस्वी; आतापर्यंत ४ हजार ५०० संदेशांचे वहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : जिल्हा पोलिसदलाने नागरिकाभिमुख प्रशासकीय कामाबाबत मोठे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि गुन्ह्यांच्या तपासाची सद्यःस्थिती आता थेट तक्रारदाराच्या मोबाईलवर देणारा ‘मिशन प्रगती’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पोलिस ठाण्याचे वारंवार उंबरठे झिजवण्याची गरज नाही. त्यामुळे पोलिसांची पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
अनेकदा पोलिस ठाण्यात तक्रार किंवा एफआयआर दाखल केल्यानंतर पुढे काय कारवाई झाली, याची माहिती सामान्य नागरिकांना मिळत नाही. हीच अडचण ओळखून पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून १० जुलै २०२५ पासून ‘मिशन प्रगती’ची सुरवात करण्यात आली. या अंतर्गत गुन्ह्याचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती थेट व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे दिली जाते. या उपक्रमाला अल्पावधीतच मोठे यश मिळाले आहे. यामध्ये लाभार्थी तक्रारदार जवळपास १ हजार ४५० आहेत. त्यांना व्हॉट्सअॅप व एसएमएसद्वारे ४ हजार ५००संदेश पाठवण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयातील २ विशेष पोलिस अंमलदारांमार्फत या कामाचे संनियंत्रण केले जाते.
मिशन प्रगतीअंतर्गत घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला आहे का?, आरोपींना अटक करण्यात आली आहे का?, भारतीय नागरिक सुरक्षासंहिता, २०२३ नुसार नोटीस दिली आहे का, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे का? आदींची माहिती मिळते. या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होत आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिसदलाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि काही त्रुटी आढळल्यास थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.