कोकण

पावस-६० हजार विद्यार्थ्यांची स्वामी मंदिराला भेट

CD

स्वामी मंदिराला ६० हजार विद्यार्थ्यांची भेट
पावसमध्ये शालेय सहली; गणेशगुळे, पूर्णगड किल्ला, सुरूबनाचेही आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, या उद्देशाने राज्यभरातील शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. या सहलींमध्ये धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गसंपन्न स्थळांना भेटी दिल्या जातात. याच अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर हे गेल्या दोन महिन्यांत शालेय सहलींसाठी प्रमुख आकर्षण ठरले आहे. या कालावधीत सुमारे ७०० शाळांमधील जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांनी येथे दर्शन घेत परिसराची माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पावस येथील समाधी मंदिराला आवर्जून भेट देण्यासाठी सहली येत आहेत. यासोबतच गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिर व समुद्रकिनारा, पूर्णगड येथील ऐतिहासिक किल्ला तसेच गावखडी येथील सुरूबन व समुद्रकिनारा या ठिकाणांचाही सहलीत समावेश असतो. शाळांच्या सहली एक, दोन किंवा तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित केल्या जातात. यावर्षी केवळ दोन महिन्यांच्या कालखंडात सुमारे ५५० शाळांमधील ३९ हजार ७३० विद्यार्थ्यांनी पावस परिसराला भेट देत धार्मिक व सांस्कृतिक ज्ञान आत्मसात केले.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचा लाभही मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. यामध्ये सुमारे २०० शाळांमधील २० हजार विद्यार्थ्यांनी निवासाची सुविधा घेतली. अशा प्रकारे पावस येथील तीर्थक्षेत्र विद्यार्थ्यांना धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गज्ञान देणारे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र ठरत आहे.
---------
कोट
शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून येणारे विद्यार्थी अनेक लहान-मोठ्या वस्तू खरेदी करतात. या परिसरातील कोकणी उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे या उत्पादनांची जाहिरात या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असते. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात व खरेदी करतात.
- शरयू सुर्वे, व्यावसायिक, स्वामी मंदिराबाहेर, पावस
------------
कोट
या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांना आगाऊ पत्राच्या माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक ठेवले आहे तसेच नोंदणी केल्यानंतर त्यांनी वेळेवर येणे विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग ठेवला आहे. तसेच आयत्यावेळेला येणाऱ्या सहलीला जागा उपलब्ध असल्यास त्यांची सोय करण्यात येते अन्यथा त्यांना खासगी जागेचा अवलंब करावा लागतो.
- गजानन हेदवकर, व्यवस्थापक, भक्तनिवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : रवींद्र धंगेकर यांच्या घरातील दोन्ही उमेदवाराचा पराभव, पत्नीनंतर मुलगाही पराभूत

Pune Mayor: कोण होणार पुण्याचा महापौर? 'ही' नावे आहेत आघाडीवर! कशी असेल भाजपची रणनीती?

Municipal Election Results 2026 : सत्तेसाठी भाजपला मित्रपक्षाचा आधार; शिंदेसेना अन् दोन्ही राष्ट्रवादीला फटका, अकोल्यात निकालानंतरचं राजकीय समीकरण!

Mumbai Municipal Corporation Election Result: मुंबईच्या निकालात ट्विस्ट? काँग्रेस किंगमेकर? भाजपकडे मॅजिक फिगर नाहीच

Shrikant Pangarkar win Municipal Election : गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक होवून, जामीन मिळालेले श्रीकांत पांगारकर महापालिका निवडणुकीत अपक्ष विजयी!

SCROLL FOR NEXT