कोकण

आमदार लोगो मोटारीची हवाच सोडली

CD

18214

आमदार लोगो मोटारीची हवाच सोडली

जि.प.मध्ये बेशिस्त पार्किंगला शिस्त; ‘सीईओं’च्या कडक कारवाईमुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यावेळी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता थेट कारवाई करत शिस्तीचा ठाम संदेश दिला आहे.
जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पोर्च झोनमध्ये आमदार लोगो लावलेली मोटार नियमबाह्य पद्धतीने उभी केली होती. याच मार्गावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शासकीय गाडी कार्यालयासमोर येत असताना ती अडथळा ठरली. परिणामी, सीईओ यांची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. विशेष म्हणजे, संबंधित चालक उपस्थित असतानाही त्याने गाडी बाजूला घेण्याची कोणतीही हालचाल केली नाही. सर्व परिस्थिती स्पष्ट दिसत असतानाही चालक निष्क्रिय राहिल्याने अखेर श्री. खेबूडकर स्वतः गाडीतून उतरले आणि कोणतीही तडजोड न करता त्या गाडीची हवा सोडून चावी ताब्यात घेतली. या घटनेमुळे जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांच्या या थेट कारवाईमुळे नियम सर्वांसाठी समान आहेत हा स्पष्ट संदेश गेला असून, बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. तसेच जिल्हा परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी व वाहनचालकांनी जबाबदारीने, शिस्तीने वागावे; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे.
---------------
‘वाहनतळ’ची गरज अधोरेखित
जिल्हा परिषद कार्यालयातील वाहनतळाचा प्रश्न हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. खासगी व शासकीय वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने बेशिस्त पार्किंगच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रशस्त वाहनतळ उपलब्ध करणे तसेच खासगी व शासकीय वाहनतळ स्वतंत्र करण्याची मागणी पुन्हा पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नाना भानगिरे यांचा पराभव

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Devendra Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत; म्हणाले...

U19 World Cup : वैभव सूर्यवंशीला चॅलेंज देणाऱ्या Sameer Minhasने शेपूट घातले, पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडसमोर गुडघे टेकले

BJP Victory and Rasmalai trend : भाजपने जिंकली महापालिकांची लढाई अन् सोशल मीडायवर ट्रेंड होतेय 'रसमलाई'

SCROLL FOR NEXT