कोकण

व्यापारी संघटना वर्धापननिमित्त तळरे येथे उद्या विविध कार्यक्रम

CD

व्यापारी संघटना वर्धापननिमित्त
तळरे येथे उद्या विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ ः येथील आदर्श व्यापारी संघटना यांच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. १८) येथील बाजारपेठेत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त सकाळी ८.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, तर सकाळी ११ वाजता श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तळेरे गावठण–बुवा संतोष तळेकर यांचे भजन होणार आहे. दुपारी १ वाजता श्री गांगेश्वर महिला भजन मंडळ, तळेरे-घाडीवाडी (बुवा कुमारी आर्या घाडी) यांचे भजन सादर होईल. दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला असून, सायंकाळी ४ वाजता श्री देव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ आणि तारा देवी फुगडी मंडळ, केळूस–वेंगुर्ले यांच्यात फुगडीचा जंगी सामना रंगणार आहे. सायंकाळी पाचला दत्तात्रय तुकाराम जठार यांच्या स्मरणार्थ राजू जठार पुरस्कृत यशस्वी उद्योजक पुरस्कार, पर्शुराम कृष्णाजी तळेकर यांच्या स्मरणार्थ सूर्यकांत परशुराम तळेकर पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार तसेच लक्ष्मी गुरुनाथ कल्याणकर यांच्या स्मरणार्थ दशरथ ऊर्फ बाबू कल्याणकर पुरस्कृत उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर, जिल्हा कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपसरपंच संदीप घाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ वाजता साई कला मंच निर्मित ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा पारंपरिक नृत्यांनी नटलेला संगीतमय कलाविष्कार सादर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार व सचिव श्रीधर ऊर्फ आप्पा कल्याणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत भाजपचा ८९ जागांवर विजय, महापौर महायुतीचाच

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Devendra Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत; म्हणाले...

SCROLL FOR NEXT