rat16p1.jpg
18131
रत्नागिरीः शहराजवळील भाट्ये येथे सुरू असलेले धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम.
-----
किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी २५ बंधारे
कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना; ७८ कोटी ७८ लाखांचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण २५ संवेदनशील ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे. या सर्व कामांसाठी शासनाने सुमारे ७८ कोटी ७८ लाखाहून अधिक निधीची भरीव तरतूद केली आहे. अनेक ठिकाणी सीआरझेड व पर्यावरण विभागाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना वेग आला आहे, अशी माहिती पत्तन अभियंता वीणा पुजारी यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील आरे आणि नेवरे येथील कामांना प्राधान्याने सुरवात होणार आहे. आरे येथे ८२५ मीटर लांबीच्या बंधाऱ्यासाठी ८ कोटी १९ लाख ८० हजार ७६४ रुपये, नेवरे येथे ५२५ मीटर लांबीच्या कामासाठी ५ कोटी २३ लाख ८७ हजार ६७३ रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे तसेच वेळणेश्वर (वेंगणी) येथे ५ कोटी ५३ लाख ५९ हजार, घेरापूर्णगड येथे २ कोटी ९३ लाख ७७ हजारांच्या निधीतून संरक्षक बंधारे उभारले जात आहेत.
विशेष म्हणजे गणपतीपुळे येथील संवेदनशील किनाऱ्यासाठी ३० लाख ३६ हजार रुपयांच्या जिओ बॅग्स बंधाऱ्याचे कामही होणार आहे.
दापोली तालुक्यातील किनारपट्टीच्या गावांमध्येही या योजनेचा मोठा विस्तार झाला आहे. आडे येथे ३ कोटी ५३ लाख १२ हजार, कर्दे (भाग १) येथे ३ कोटी ५३ लाख ५ हजार तर कर्दे (भाग २) येथे ४ कोटी ९२ लाख २३ हजार, कोळथरे येथे ३ कोटी ५२ लाख ६९ हजार, लाडघर येथे ४ कोटी २२ लाख ३९ हजार आणि मुरूड येथे ५ कोटी ६३ लाख ७ हजार व ५ कोटी ६४ लाख २४ हजार रुपयांची दोन स्वतंत्र कामे मंजूर आहेत. हर्णै (भाग १ व २) मिळून सुमारे ८ कोटी ३० लाखांहून अधिक निधीतून बंधारे बांधले जात आहेत. पाजपंढरी येथे ३ कोटी ५१ लाख ३९ हजार, बुरोंडी येथे ३ कोटी ५३ लाख ५ हजार, पाडलेमध्ये ३ कोटी ९७ लाख ९७ हजार आणि साळुंद्रे येथे ४ कोटी ५८ लाख ४९ हजारांच्या निधीला तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. करंजगाव येथे ३ कोटी ८९ लाख ४६ हजार रुपयांचे कामही यात समाविष्ट आहे.
चौकट
गणेशगुळे, भाट्ये, गावखडीचे संरक्षण
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे ७ कोटी ९२ लाख ३२ हजार रुपये खर्चाचा १,१७२ मीटर लांबीचा बंधारा, भाट्ये येथे ६ कोटी ३३ लाख ८१ हजार रुपये खर्चाचा ८८४ मीटरचा बंधारा आणि गावखडी येथे ७ कोटी ९ लाख ३५ हजार रुपये खर्चाचे संरक्षक काम हाती घेण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.