- ratchl१६३.jpg ः
P२६O१८२६८
चिपळूण ः स्व. गोविंदराव निकम यांच्या ९१व्या जयंती सोहळ्याप्रसंगी आमदार शेखर निकम, वक्ते यजुर्वेंद्र महाजन व मान्यवर.
----
अफाट स्वप्नांनीच पंखांना बळ मिळते
यजुर्वेंद्र महाजन; गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः शिक्षणात परिवर्तनाचे सामर्थ्य आहे. ग्रामीण, वंचित व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनात गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्णायक ठरू शकते. त्यांच्या आकांक्षांना समाजाने बळ देण्याची गरज आहे. माणूस गेला तरी त्यांचे अलौकिक कार्य आणि विचार आपल्यातच जिवंत राहतात, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी सावर्डे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. १६) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्व. निकमांच्या जीवनकार्याचे स्मरण, त्यातून घेण्याजोगे मूल्य आणि नव्या पिढीसाठीचा आशेचा संदेश या सोहळ्याचे केंद्रबिंदू ठरले. सुरुवातीला उपस्थितांनी क्षणभर डोळे बंद करून निकम यांचे स्मरण केले. औपचारिकता नाही, कृतज्ञतेचा संकल्प या भावनेने प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यातून किमान एक गुण आत्मसात करण्याचा निर्धार केला. प्रमुख वक्ते यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय त्याची संकल्पना मांडली. त्यांनी आत्मविश्वास, ध्येयवाद व मानवी क्षमतेचा उलगडा केला. त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्याचा परिचय करून दिला. ते म्हणाले, संस्थेच्यावतीने २०१५ पासून अंध, अस्थिव्यंग, मूकबधीर, अनाथ व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी व निःशुल्क उच्चशिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जाते. येथील दिव्यांग आयएएस, बँक अधिकारी, प्राप्तिकर अधिकारी म्हणून स्वाभिमानाने उभे आहेत.
या कार्यक्रमाला अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते, सह्याद्री पुरस्कार विजेते संजीव करपे, संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, विश्वस्त शांताराम खानविलकर, मारुतराव घाग, मानसिंग महाडिक, सचिव महेश महाडिक, प्रशांत निकम, चित्रकार जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रकाश राजेशिर्के, अंजनी चोरगे, युगंधरा राजेशिर्के, पूजा निकम यांच्यासह सावर्डेचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.