-Rat१७p९.jpg -
२६O१८३९९
मंडणगड : कुणबी भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना अॅड. समिधा सापटे. शेजारी अस्मिता केंद्रे, दिव्या साळवी.
-----
महिलांनी देशविकासात सक्रिय व्हावे
अॅड. समिधा सापटे ः कुणबी सेवा संघ हळदीकुंकू कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत महिलांनी आपले स्त्रीत्व जपत उत्तम आरोग्याच्या बळावर कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीसाठी जागरूकपणे कार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. समिधा सापटे यांनी केले.
मंडणगड येथील कुणबी भवनाच्या वर्धापनदिनानिमित्त मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महिला आघाडीच्यावतीने हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. अॅड. सापटे म्हणाल्या, आजच्या काळात महिलांनी केवळ चूल-मूल कुटुंबापुरते मर्यादित न राहता रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, डॉ. शरयू बैकर, नगरसेविका प्रमिला किंजळे, महिला सरपंच सानिका पाटील, दीपिका जाखल, अंजली घागरूम, सुषमा बांडल, भाविका बोबले, करिता रक्ते आदी उपस्थित होत्या. डॉ. शरयू बैकर यांनी महिलांच्या आरोग्याविषयी, औषधे आणि काळजी या विषयी मार्गदर्शन केले.