गोगटे महाविद्यालयात
अनुवाद अभ्यासवर्ग
रत्नागिरी ः गोगटे–जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने ३० तासांच्या ‘अनुवाद’ प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या हस्ते झाले. पीएम-उषाअंतर्गत हा वर्ग भरवण्यात आला आहे. या वेळी मसुरकर यांनी अनुवादाचे बदलते स्वरूप स्पष्ट करताना आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अनुवाद हे केवळ भाषांतर न राहता विचार, संस्कृती आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे प्रभावी माध्यम बनले आहे. पत्रकारिता, माध्यमे, प्रशासन, शिक्षण व उद्योगक्षेत्रात अनुवादाच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे अधोरेखित केले. हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी अशा अभ्यासवर्गांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध होतात, असे सांगितले.
मराठी भाषा संवर्धन
पंधरवडा सुरू
रत्नागिरी ः येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला सुरुवात झाली. मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते पंधरवड्याचे उद्घाटन झाले. त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिचे संवर्धन करण्याची गरज तसेच दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर कसा करावा या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी व्यक्तीपरिचय उपक्रमाअंतर्गत निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जीवन व साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. मराठी विभागप्रमुख पावरी यांनी आभार मानले.
रेखाकला परीक्षेत
श्रेयस जाधवचे यश
रत्नागिरी ः राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थी श्रेयस जाधव याने राज्य गुणवत्ता यादीमध्ये २१वा क्रमांक मिळवला. त्याने डिझाईन विषयात राज्यात तिसरा, जिल्ह्यात दुसरा तर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. इंटरमिजिएट परीक्षेला एकूण ४२ विद्यार्थी बसले. परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेला ३० विद्यार्थी बसले. याही परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, मार्गदर्शक कलाशिक्षक राहुल कळंबटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.