रत्नागिरीत २३पासून क्रिडाईचे ‘वास्तुरंग’ प्रदर्शन
महेश गुंदेचा ः निसर्गरम्य कोकणात घर खरेदीची सुवर्णसंधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी क्रिडाई रत्नागिरीने ‘वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६’ चे भव्य आयोजन केले आहे. हे प्रदर्शन २३ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावाजवळ होणार आहे. या द्वारे गृहस्वप्नपूर्तीची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती क्रिडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी दिली.
या वेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष प्रवीण जैन, उपाध्यक्ष रूपेश साळवी, सचिव प्रदीप कट्टे, खजिनदार महावीर जैन आदी उपस्थित होते. ते म्हणाले, क्रिडाईमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे १-२ बीएचके फ्लॅट्स, आलिशान बंगले, रो-हाउसेस आणि गुंतवणुकीसाठी एनए प्लॉट्सचे विविध प्रकल्प येथे सादर केले जातील. विशेष म्हणजे, प्रदर्शनातील सर्व प्रकल्प ‘महारेरा’ नोंदणीकृत असल्याने ग्राहकांना व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळेल. केवळ घरांचे पर्यायच नव्हे तर घर खरेदीसाठी लागणाऱ्या अर्थसाह्यासाठीही येथे सोय करण्यात आली आहे. विविध नामांकित बँकांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपस्थित राहणार आहेत. ग्राहकांना तिथेच आपल्या कर्जाची पात्रता तपासून गृहकर्जाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकतील. प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्यांचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनात बुकिंगवर विशेष सवलती, स्पॉट डिस्काउंट आणि आकर्षक भेटवस्तूंची रेलचेल असणार आहे, असे गुंदेचा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.