कोकण

काळजीसोबत येतात शारीरिक व्याधीची लक्षणे

CD

rat18p4.jpg
O18522
डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे
-------

राखूया मनाचे आरोग्य...लोगो

इंट्रो
अलीकडे छातीत सतत धडधडतं, दम लागल्यासारखं होतंय आणि छातीत दुखतं. बऱ्याच तपासण्या केल्या, कशात काहीच निघालं नाही आता काय करू0 घाबरू नका, असा प्रसंग बऱ्याच जणांवर आला असेल. जेव्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात; पण तरी त्रास कमीच नाही. काही वेळा तर भीती इतकी शिगेला जाते की असे वाटते. ‘‘मला आता दवाखान्यात घेऊन चला, डॉक्टरकडे घेऊन चला नाहीतर मी मरणार’’, जवळ जवळ सगळी लक्षणे हृदयविकाराची पण तपासण्या नॉर्मल, टू डी इको, ईसीजी, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन सगळे नॉर्मल. तर अशा या अवस्थेला एन्झायटी डिसॉर्डर (anxiety disorder) असे म्हणतात.
- डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे, रत्नागिरी
(एमबीबीएस, डी.पी.एम., एमआयपीएस)

काळजीसोबत येतात शारीरिक व्याधीची लक्षणे

आता मुळात anxiety म्हणजे नेमके काय? याला काळजीचा आजार किंवा चिंतेचा आजार असे म्हणतात. आता यावर तुम्ही असे म्हणाल की, काळजी तर प्रत्येकालाच असते, कुणाला आजची काळजी, कुणाला उद्याची, कुणाला आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी तर कुणाला आजाराची काळजी. पण जर या काळजी सोबत, या विचारांसोबत शारीरिक लक्षणे दिसू लागले तर त्याला फक्त काळजी न म्हणता काळजीचा आजार असे म्हणता येईल तर अशा या अवस्थेतत कोणती शारीरिक लक्षणे दिसतात?
१) छातीत धडधड होणे, बैचेन होणे, अस्वस्थ वाटणे, अचानक घाम येणे, कसली तरी न सांगता येणार अशी भीती वाटत राहणे.
२)मन थाऱ्यावर नसणे, सततचे कसले ना कसले विचार येत राहणे, एक विचार संपला की दुसरा मग तिसरा..चौथा अशी विचारांची शृंखला चालू राहणे. थोड्या वेळाने भानावर आले की, डोके जड झालेले आसते, धडधड सुरू झालेली असते.
३) सकाळी उठले की, डोके जड आसणे, सतत होणारी डोकेदुखी, वारंवार मळमळ, पित्ताचा त्रास होणे.
४) काहीजणांना फक्त आजाराची भीती किंवा काळजी वाटत असते. उदा., खूप तापसण्या करून देखील डोकेदुखीचा काही निदान होत नसेल तर मला काही मोठा आजार तर नाहीये ना..मला कॅन्सर वगैरे असा जीवघेणा आजार तर नसेल ना..!! अचानक छातीत दुखल्यास किंवा अचानक घाम आल्यास मला हार्ट अटॅक तर येणार नाही ना..!
५) एकंदरीत मनावर कायम भीतीची टांगती तलवार असल्याने अशा व्यक्तींच्या वर्तनात मोठा बदल दिसून येतो. उदा. तब्येतीची आतिकाळजी घेणे, खूप पथ्यपाणी करणे, घराच्या बाहेर जाणे टाळणे,"मी नेमका बाहेर गेलो आणि मला काही झाले तर मला औषधोपचार वेळेवर मिळाले नाही तर0" थोडक्यात काय..तर निवांत राहणे बंद होते.
६) आजून एक प्रामुख्याने दिसत असलेले लक्षण म्हणजे.. " माझं प्रेशर गोळ्या खाऊन पण कमी होत नाहीए किंवा गोळी खाल्ल्यावर तात्पुरते बरे वाटते पण थोड्या वेळाने परत घाम येतो, छातीत दुखायला लागतं व प्रेशर वाढलेलं असतं. थोडक्यात हृदविकाराची सगळी लक्षणे दिसतात; पण रिपोर्ट्स नॉर्मल आणि याच्यामुळे आजून एक नवी भीती उद्भवते, उद्या मला काही बरे-वाईट झाले तर माझ्या माघारी माझ्या जवळच्या व्यक्तीचं, माझ्या नातलगांचे कसे होणार0"
७) एकंदरीत सततच्या अशा काळजीमुळे, भितीच्या विचारांमुळे झोपेची समस्या चालू होते. उशिरा झोप लागणे, मध्यरात्री २-३वेळेस जाग येणे, पहाटे लवकर जाग घेणे, थकायला होणे, तरुणवयात येणार विस्मरण. झोपेची गोळी खाऊनसुद्धा झोप न लागणे.
८) कोविडच्या काळानंतर काळजीचे प्रमाण वाढले आहे. उदा. आपल्या वाडीमध्ये, घराजवळ किंवा आपल्या वयाचे कुणी वारले तर तसेच टीव्ही, व्हॉट्सअॅपवरती एखादी बॉम्बस्फोट, अपघात किंवा इतर वाईट बातमी वाचली तर लगेच आपल्या छातीत धडधते, भीती वाढते वा आपले प्रेशर वाढते.
९)) एन्जायटी डिसॉर्डर प्रामुख्याने तरुण पिढीमध्ये वाढत आहे याचे महत्वाचे व घातक असे कारण म्हणजे मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर.
आजच्या पिढीची ट्रेंडिग एन्जायटी कोणती असेल तर ती आहे bluetick anxiety. समोरील व्यक्तीने आपला मेसेज वाचला आहे का हे सतत तपासणे, वाचला असेल तर रिप्लाय कधी करणार किंवा रिप्लाय का देत नाहीये, माझा स्टेटस कितीजणांनी पहिला, अमुक इतक्याच कमी लोकांनीच लाइक का केलं, माझे लाइक्स कधी वाढणार, माझे फॉलोअर्स कधी वाढणार, ही एन्जायटीमुळे नकळत युवापिढीचा वेळ आणि मेंदू दोन्हीही वाया जात आहे. आपण एन्जायटीवरती खूप सोप्या पद्धतीने मात करू शकतो जसे की, जेव्हा बऱ्याच तपासण्या नॉर्मल येतात तेव्हा मानसोपचारतज्ञांना किंवा समुपदेशकाना संपर्क करा. समुपदेशन, थेरपी, सीबीटी, औषधोपचार, डाएट कौन्सिलिंग असे बरेच उपचार करता येतात. सर्वात महत्वाचे गुगल सर्फिंग टाळावे. त्याने अनावश्यक अती माहितीचा मारा होतो व आता पर्यंत नसलेली नवीन अँक्सिएटी ,नवीन काळजी सुरू होते. रोजचा नियमित व्यायाम, निरोगी व ताजे जेवण, पुरेशी झोप, सोशल मीडियाचा अनावश्यक व अतीवापर बंद व डॉक्टरांचा सल्ला इतकेच केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारची अँक्सिएटी होणे टळेल.

(लेखक सुवर्णपदकप्राप्त मानसोपचारतज्ञ , व्यसनमुक्तीतज्ञ व समुपदेशक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! दादर ते जेएनपीटी नवा मार्ग सुरू होणार; लोकलला मोठा दिलासा, पण कधीपासून?

IND vs NZ, 3rd ODI: डॅरिल मिशेल-ग्लेन फिलिप्सचा शतकी दणका! भारतासमोर 'करो वा मरो' सामन्यात न्यूझीलंडने ठेवलं मोठं लक्ष्य

अमिर खानच्या लेकासोबत साई पल्लवी स्क्रीन शेअर करणार, 'एक दिन' सिनेमाचा टीझरमधून वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

AI Prank: ‘एआय’ इमेजचा विखारी प्रँक, बनावट अजगरामुळे टेन्शन वाढलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT