कोकण

खेळाडू आरक्षणासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान

CD

खेळाडू आरक्षणासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान

अजय शिंदे ः जलद प्रक्रियेसह गुणवंतांना मिळणार न्याय

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : ‘महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्रात ५ टक्के खेळाडूंसाठी आरक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह करण्यासाठी आता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रक्रियेतील फेरफार थांबणार असून खऱ्या आणि गुणवंत खेळाडूंना वेळेत न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’ अशी माहिती जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.
या नवीन प्रणालीची माहिती देण्यासाठी कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष ऑनलाइन समन्वय सभा घेतली.
दरम्यान, जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंची माहिती आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया २५ जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. ‘पात्र खेळाडूंनी आपली आवश्यक कागदपत्रे वेळेत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करावीत,’ असे आवाहन जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे करण्यात आले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे क्रीडा आरक्षण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल. ‘राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही सुधारणा दिशादर्शक ठरेल,’ असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. या ऑनलाइन सभेला सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसुळ, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांतील विभागीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---
प्रक्रिया पूर्णपणे छेडछाडमुक्त
‘ब्लॉकचेन’ प्रणाली ही प्रक्रिया पूर्णपणे छेडछाडमुक्त असेल. यामुळे ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील खेळाडूंना समान संधी मिळेल. कोल्हापूर येथे उभारलेल्या ‘स्पोर्टस् सायन्स सेंटर’मध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना मोफत वैज्ञानिक प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. श्री. शिंदे यांनी मांडलेल्या तांत्रिक अडचणींवर उपसंचालकांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT