कोकण

वीज कंत्राटींसाठी संघटित लढा देऊ

CD

18650

वीज कंत्राटींसाठी संघटित लढा देऊ

अशोक सावंत ः कुडाळात कामगार संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेल्यास यश दूर नाही. अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. महावितरण कामगारांवर अन्याय झाला, त्यावेळी आम्ही संघटितपणे लढा दिला व यशस्वी झालो. भविष्यात सर्वांनी गटबाजी न करता एकत्र यावे, असे प्रतिपादन वीज कंत्राटी कामगारांचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी त्रैवार्षिक अधिवेशनात आज येथे केले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघचे सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशन संघटनेचे राज्य नेते सागर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे पार पडले. यावेळी राज्य पातळीवरील नेते सत्यविजय जाधव, गोपाळ कुलकर्णी, कृष्णांत बच्चेपाटील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संभाजी उर्फ आनंद लाड, जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, दिनेश तांबे, मोहन गावडे, सचिन राघव, सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, महेश राऊळ तसेच महानिर्मिती महापारेषण महावितरण विभागात काम करणारे जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते
श्री. सावंत म्हणाले, "कोणतेही यश मिळवायचे असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही गेली. कित्येक वर्षे आम्ही लढा लढत असताना एकाच वेळी साडेपाचशे वीज कंत्राटी कामगारांचे प्रश्न खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावले. भविष्यात जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
सागर पवार यांनी, कोणत्याही परिस्थितीत संघटित लढा फार महत्त्वाचा आहे. आपली संघटना अधिक भक्कम कशी होईल, यासाठी काम करण्याची गरज व्यक्त केली. सत्यविजय जाधव यांनी, कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत तर एकजूट महत्त्वाची आहे, असे सांगितले. आनंद लाड यांनी कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. संदीप बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद लाड व नूतन जिल्हाध्यक्ष बांदेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT