कोकण

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार

CD

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘संघर्ष
डॉ. विशाल चंद्रकार : पर्यावरणातील बदलाने शेतीला फटका, मनुष्यबळाचीही कमतरता
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १९ : बदलते हवामान, पावसाची अनिश्चितता, वाढता वन्यप्राणी उपद्रव आणि मनुष्यबळाची टंचाई यामुळे कोकणातील शेती संकटात सापडली असून शेतकरी हतबल होत आहे. या परिस्थितीत केवळ आंदोलने नव्हे, तर रचनात्मक काम, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार भारतीय किसान संघाने केला आहे, असे प्रतिपादन संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्रकार यांनी केले.
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामिनाथन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणीय बदलांचा थेट फटका शेतीला बसत असून त्याचे गंभीर परिणाम शेतकरी वर्गावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. चंद्रकार म्हणाले, शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याने, पावसाच्या अनियमिततेमुळे पीक नुकसान वाढल्याने तसेच रानडुक्कर, माकड, वानर यांसारख्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी भारतीय किसान संघ देशपातळीवर सक्रिय आहे. भारतीय किसान संघ ही देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना असून ती केवळ आंदोलनापुरती मर्यादित नाही, तर शासनासोबत समन्वय ठेवून शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रासायनिक खते व औषध उत्पादक कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच कोकणातील पिकांच्या गरजेनुसार शेती अवजारे शासकीय योजनांत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्रकार, महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, रत्नागिरी जिल्हा मंत्री धनंजय जोशी उपस्थित होते.
-----
चौकट
बागायतीसाठी वीज जोडणीची मागणी
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नारळ व सुपारी बागायतींसाठी सौर कृषी पंप प्रभावी ठरत नसल्याने कृषी वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे करण्यात आल्याचे डॉ. चंद्रकार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT