कोकण

पुण्यात वास्तविक दशावतार महोत्सवाचा उत्साहात समारोप

CD

18696

पुण्यात वास्तविक दशावतार
महोत्सवाचा उत्साहात समारोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः महाराष्ट्राच्या कोकण भूमीत जन्मलेली आणि शतकानुशतके जपली गेलेली दशावतार लोकनाट्य परंपरा शहरी रंगमंचावर प्रभावीपणे सादर करत ‘वास्तविक दशावतार महोत्सव’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. बालगंधर्व नाट्यगृह, पुणे (९ जानेवारी), नटसम्राट निळू फुले सभागृह, पिंपरी-चिंचवड (१० जानेवारी) तसेच पुणे इंटरनॅशनल सेंटर, पाषाण (११ जानेवारी) येथे झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
या महोत्सवात कोकणातील पारंपरिक दशावतार लोकनाट्याचे अस्सल सादरीकरण करण्यात आले. ‘नरसिंह अवतार’, ‘भक्त पुंडलिक’ आणि ‘गरुडझेप’ ही तीन पारंपरिक कथानके सादर करण्यात आली. थेट वाद्यसंगीत, पारंपरिक रंगभूषा, मुखवटे, उत्स्फूर्त संवाद आणि भावपूर्ण अभिनयाच्या माध्यमातून दशावतार परंपरेची आध्यात्मिक व सांस्कृतिक खोली प्रेक्षकांसमोर उलगडली. खानोलकर दशावतार नाट्यमंडळींनी केलेले सादरीकरण रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारे ठरले. या महोत्सवाला प्रवीण तरडे, पंडित रघुनंदन पणशीकर, अनुपम जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT