कोकण

मालवणात पाचशे किलो प्लास्टिक जप्त

CD

18723

मालवणात पाचशे किलो प्लास्टिक जप्त

पालिकेची धडक कारवाई; मच्छिमार्केट परिसरातून रिक्षाटेम्पो ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : पर्यावरणास घातक असलेल्या आणि शासनाने बंदी घातलेल्या ‘सिंगल युज’ प्लास्टिक विरोधात येथील पालिकेने आज सकाळी धडक कारवाई केली. मच्छिमार्केट परिसरातील मासे लिलाव ठिकाणी छापा टाकून प्रशासनाने एका रिक्षा टेम्पोसह सुमारे ५०० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला.
येथील मच्छिमार्केट परिसरात प्लास्टिक पिशव्यांची घाऊक (होलसेल) विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पालिका प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्वच्छता निरीक्षक संजय पवार, आरोग्य लिपिक मंदार केळूसकर आणि कर्मचारी सागर जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या रिक्षा टेम्पोमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा साठवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. हा साठा कट्टा येथून आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पालिकेच्या पथकाने रिक्षा टेम्पोसह सर्व प्लास्टिक साठा ताब्यात घेऊन पालिका कार्यालयात जमा केला. संबंधित व्यक्तीवर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास नियमानुसार अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी दिला आहे.
--------
...तर प्राण्यांच्या आरोग्याला धोका
प्लास्टिक हे विघटनशील नसल्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. ड्रेनेज व्यवस्था तुंबणे आणि प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणे यांसारख्या समस्या यामुळे उद्भवतात. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहील, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. या धडक कारवाईबद्दल उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वच्छता विभागाचे विशेष कौतुक केले. मालवण शहराच्या हितासाठी आणि स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक कार्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे पाठीशी आहोत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT