कोकण

समाजात कर्तृत्वाने आदर्श निर्माण करा

CD

18804

समाजात कर्तृत्वाने आदर्श निर्माण करा

डॉ. विजय दळवी ः कुडाळात संस्थान मराठा समाजाचे स्नेहसंमेलन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा, सचोटी असल्यास यश मिळवता येते. तुमच्याकडे कल्पकता, विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा उद्योजक बना. शिक्षण पैशासाठी घेऊ नका तर समाजात आदर्श माणूस म्हणून कर्तृत्व निर्माण करा. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्या, असे आवाहन मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी रविवारी (ता. १८) येथे केले.
सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेचे ३१ वे सिंधुदुर्ग जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ येथील मराठा समाजाच्या पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज स्मारक सभागृह येथे उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी डॉ. दळवी व प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जयप्रकाश परब उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यकारी विश्वस्त सतीश सावंत, कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, विश्वस्त अनुश्री माळगावकर, कुडाळ समिती प्रमुख आर. एल. परब, समन्वयक नंदकिशोर गावडे, चिटणीस दिलीप दळवी, स्वागताध्यक्ष अदिती सावंत, सावंतवाडी समिती प्रमुख विठ्ठल नाईक, किशोर सावंत, डॉ. दीपाली काजरेकर, चंदू कदम, राज चव्हाण, बाळा राऊळ, राजू परब, श्री. पालव आदी उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज शाळा सुधार पुरस्कार रामेश्वर माध्यमिक विद्यालय बाव शाळेला, मराठा समाज गौरव पुरस्कार प्रगतशील शेतकरी मधुकर राणे (कसाल), दशावतारी कलाकार उदय राणे-कोनसकर, वैद्यकीय सेवेसाठी डॉ. प्रशांत मडव (जांभवडे) यांना प्रदान करण्यात आला. राजमाता जिजाऊ पुरस्कार (कै.) प्रतिभा भगवान दळवी (मरणोत्तर) यांना प्रदान केला. त्यांचे पती भगवान दळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शैक्षणिक साहित्यकृती पुरस्कार प्राप्त गायत्री धुरी, सामाजिक कार्यकर्त्या मानसी परब, पखवाज विशारद गार्गी सावंत व उत्कृष्ट बालकलाकार आरव आईर, दिव्यांग महिला क्रिकेटपटू स्मिता गावडे, शिल्पा गावकर व दीक्षा तेली-परब, कबड्डी प्रशिक्षक गुरुनाथ सावंत, जलतरणपटू पूर्वा गावडे, मिताली गावडे, अक्षता राऊळ, पलक गावडे, स्थानिक समितीचे आर. एल. परब, बाळकृष्ण परब यांच्यासह गुणवंतांचा सन्मान केला. दिलीप दळवी यांनी प्रास्ताविक केले. अदिती सावंत यांनी स्वागत केले. बाळकृष्ण परब, के. बी. परब यांनी सूत्रसंचालन केले. पारितोषिक वितरण वाचन गुरुनाथ धुरी व धोंडू रेडकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT