कोकण

सावंतवाडीचा आरोग्यप्रश्न तातडीने सोडवा

CD

18807

सावंतवाडीचा आरोग्यप्रश्न तातडीने सोडवा

आरोग्यमंत्र्यांचे आदेश; रिक्त पदांबाबत घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यू., रक्तपेढी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदांचा प्रश्न तातडीने सोडवा, असे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांना दिले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रवींद्र ओगले, माडखोल माजी सरपंच संजय लाड, मल्टिस्पेशालिटी जागा मालक रवींद्र केरकर, अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गचे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नंदन वेंगुर्लेकर, बँक आँफ बरोडाचे सेवानिवृत्त अधिकारी संपत दळवी आदींच्या शिष्टमंडळाने श्री. आबिटकर यांची आज त्यांच्या निवासस्थानी गारगोटी येथे भेट घेतली.
श्री. ओगले यांनी अभिनव फाउंडेशनने सावंतवाडी रुग्णालयप्रश्नी दाखल केलेली जनहित याचिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नऊ रिक्त पदे, ट्रामा केअर युनिटमधील सर्व पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, व्यवस्थेअभावी गोवा-बांबोळी येथे पाठवले जाणारे रुग्ण, रखडलेले मल्टिस्पेशालिटी यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबत रुग्णालय कृती समितीच्या वतीने निवेदन सादर केले. श्री. आबिटकर यांनी निवेदन स्वीकारून तातडीने उपसंचालक डॉ. माने यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. समितीने मांडलेल्या प्रश्नासंदर्भात उपसंचालकांनी जातीने लक्ष घालून या प्रश्नांचा निपटारा करावा. कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मार्ग  काढावा, अशा सूचना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिल्या.
---
समितीने वेधले आरोग्यमंत्र्यांचे लक्ष
सावंतवाडीत रुग्णालयप्रश्नी २६ जानेवारीला उपजिल्हा रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषणाचाही इशारा समितीने यावेळी दिला. यासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठकीच्या सूचना द्याव्या लागतील, अशी चर्चा झाली. गेली कित्येक वर्षे सावंतवाडी  रुग्णालयाचा प्रश्न रखडला आहे. अत्यवस्थ स्थितीत रुग्णांवर जिल्ह्यात उपचार होत नाहीत. त्यांना ‘गोमेकॉ’, कोल्हापूर येथे हलवावे लागते. हा जीवघेणा प्रवास आता तरी थांबवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT