कोकण

सावंतवाडीत प्रलंबित कामे मार्गी लावा

CD

18808

सावंतवाडीत प्रलंबित कामे मार्गी लावा

देव्या सूर्याजी ः पालिका अधिकाऱ्यांसोबत समस्यांची पाहणी

सकाळ वृत्तेसवा
सावंतवाडी, ता. १९ ः शहरातील सालईवाडा प्रभाग क्रमांक ६ मधील ड्रेनेज, नाले सफाई आणि विविध नागरी समस्यांबाबत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
​या पाहणीदरम्यान प्रभागातील सर्व नाल्यांवरील वाढलेली झाडी तोडून नाले साफ करण्यात आले. पोकळे घर व दैवज्ञ गणपती मंदिर परिसरातील रस्त्यावर साचणारे ड्रेनेज व पावसाचे पाणी योग्य गटारातून नाल्यापर्यंत जाण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक शौचालय ते गवंडळकर घर आणि अशोक मेस्त्री यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधून बालाजी मठामागील नाल्यापर्यंत चेंबर टाकून ते बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या. ​याशिवाय चॅपेल गल्ली ते दर्पण रेसिडेन्सीमागील नाला बांधणे, सिस्टर कॉन्व्हेन्ट परिसरातील साफसफाई आणि अर्धवट स्लॅब पूर्ण करण्याबाबत बांधकाम विभागाला सक्त सूचना दिल्या आहेत. ​यावेळी नगरपालिकेचे अधिकारी तुषार सरडे, विठ्ठल कशाळीकर (बांधकाम विभाग), विनोद सावंत, दीपक म्हापसेकर (आरोग्य विभाग) यांच्यासह शेखर पोकळे, जयेश पोकळे, अमित पोकळे, सुशांत पोकळे, शैलेश गवंडळकर, ॲड. प्रथमेश प्रभू, सौ. मेस्त्री व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
----
काही महत्‍त्वाचे
- सालईवाडा प्रभाग क्र. ६ मधील नागरी समस्यांची पाहणी
- ड्रेनेज, नाले सफाई व रखडलेल्या कामांची दखल
- नवीन गटार बांधण्याचे निर्देशही दिले
- गटार बंदिस्तसाठी चेंबर टाकण्याच्या सूचना
- चॅपेल गल्ली ते दर्पण रेसिडेन्सीमागील नाला बांधण्याचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

SCROLL FOR NEXT