कोकण

ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रमांची गरज

CD

swt1917.jpg
18841
उंडिल ः श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना महेश सावंत. व्यासपीठावर इतर मान्यवर.

ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रमांची गरज
महेश सावंतः उंडिल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १९ : ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांना, गुरुंना आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटेल, असे यश मिळवा. स्वप्न घेऊन जगायचे असते आणि त्यासाठी प्रचंड मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न करा. कोणतेही स्वप्न कठीण नाही, त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे, असे प्रतिपादन ध्रुव अकॅडमीचे संचालक महेश सावंत यांनी केले.
ते फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात बोलत होते. हे शिबिर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उंडिल क्र.१ येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप नारकर, फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे प्रमुख कार्यवाह संदेश नारकर, प्रसिध्द व्यावसायिक राजेंद्र नरसाळे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सरपंच प्रियंका सरवणकर, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा नर, महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुश्री नारकर, ‘अक्षरोत्सव’ प्रमुख निकेत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरादरम्यान मुलांना विविध व्याख्याने आणि प्रत्यक्षिकाद्वारे लोकशाही नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव, स्वयंरोजगार व पर्यावरण संवर्धन, स्वच्छता-आरोग्य विषयी जनजागृती अशा विविध गुणांची रुजवात केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारकर यांनी, ध्येय निश्चित केल्याशिवाय प्रयत्न योग्य दिशेने होत नाहीत. त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करा. त्यासोबतच नियमित वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. वर्तमानपत्र वाचन हे ज्ञानाचे भांडार आहे. त्याचा योग्य वापर करा, यश तुमचेच आहे, असे सांगितले.
यावेळी तिरपणकर, संदेश नारकर, राजेंद्र नरसाळे, प्रियांका सरवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुचिता चव्हाण यांनी केले. आभार प्रा. ज्योत्स्ना कदम यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT